नवी दिल्लीः Oppo A74 5G Price: हँडसेट निर्माता कंपनी Oppo ने ग्राहकांसाठी भारतात २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आपला ५ जी स्मार्टफोन लाँच केला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट, फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे यासारखे खास फीचर्स दिले आहेत. जाणून घ्या या फोनविषयी सर्वकाही. वाचाः Oppo A74 5G चे फीचर्स या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले (1080x2400 पिक्सल) एलसीडी पॅनेल आहे. या फोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेट, आस्पेक्ट रेशियो २०.९ आणि पिक्सल डेनसिटी ४०५ पिक्सल प्रति इंच आहे. या फोनमध्ये ड्यूअल नॅनो सिमचा ए74 5G स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर आधारित कलर ओएस ११.१ वर काम करतो. वाचाः या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४०८ एसओसी सोबत ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये बॅक पॅनेलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी 4जी एलटीई, 5G,ब्लूटूथ व्हर्जन 5.1, वाय-फाय 802.11एसी, जीपीएसए-जीपीएस, 3.5 मिलीमीटर ऑडियो जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चा समावेश आहे. सिक्योरिटी साठी फोनमध्ये साइड-माउंट फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. वाचाः ओप्पोच्या या फोनमध्ये पॉवरसाठी 5000 mAh ची बॅटरी दिली आहे. १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनला दोन कलर व्हेरियंट मध्ये बाजारात उतरवले आहे. फ्लूइड ब्लॅक आणि फँटास्टिक पर्पल आहे. भारतात ओप्पो ए74 5G Mobileच्या ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज ची किंमत १७ हजार ९९० रुपये आहे. या फोनची विक्री २६ एप्रिल पासून ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर सुरू होणार आहे. अॅमेझॉनवरून फोन खरेदी केल्यास काही निवडक बँख क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड ईएमआय आणि डेबिट कार्ड ट्रान्झॅक्शन वर १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tAd6GS
Comments
Post a Comment