नवी दिल्लीः मोटोरोला (Motorola) ने अखेर भारतात Moto G60 आणि Moto G40 Fusion फोनला लाँच केले आहे. हे लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये जबरदस्त कॅमेरा फीचर्स, पॉवरफुल प्रोसेसर, मोठा डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइनसोबत लाँच करण्यात आले आहे. या दोन्ही फोनचे सर्व फीचर्स जवळपास सारखेच आहेत. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये फरक म्हणजे यातील कॅमेऱ्याचा आहे. मोटोरोला एका पाठोपाठ एक बजेट स्मार्टफोन लाँच करीत आहे. परंतु, Moto G60 आणि Moto G40 फ्यूजन मोटोरोलाचे मिड-रेंज सेगमेंटचा भाग आहे. जाणून घ्या या फोनसंबंधी सर्वकाही. वाचाः Moto G40 Fusion आणि Moto G60 ची किंमत Moto G40 Fusion 4GB RAM + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. आज लाँच झालेल्या फोनपैकी सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. तर G40 Fusion के 6GB + 128GB स्टोरेज ऑप्शनची किंमत १५ हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनला कंपनीने दोन कलर मध्ये उतरवले आहे. ज्यात डायनेमिक ग्रे आणि फ्रॉस्टेड शँम्पेन कलरचा समावेश आहे. तर Moto G60 6GB + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत १७ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डायनामिक ग्रे आणि फ्रॉस्टेड शँम्पेन ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहे. लाँच ऑफर अंतर्गत या फोनला सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. आयसीआयसीआय बँक कार्ड वर १५०० रुपयांची सूट दिली जात आहे. या फोनला २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून खरेदीसाठी उपलब्ध करण्यात येईल. वाचाः Moto G40 Fusion आणि Moto G60 चा सेल आणि डिस्काउंट ऑफर्स Moto G40 Fusion स्मार्टफोनला खरेदी करायचे असेल तर तुम्ही १ मे रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकाल. तसेच ICICI कार्ड धारकांना या फोन्सच्या खरेदीवर १ हजार रुपयांचे डिस्काउंट मिळू शकते. Moto G60 फोनला २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे. लाँच ऑफर अंतर्गत या फोनवर १५०० रुपयांचा इंस्टेंट डिस्काउंट दिला जाऊ शकतो. वाचाः Moto G60 आणि Fusion चे फीचर्स Moto G60 मध्ये HDR10 सोबत ६.८० इंचाचा मॅक्स व्हिजन FHD + डिस्प्ले दिला आहे. Moto G60 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सोबत क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२ जीबी प्रोसेसर सोबत येणार आहे. स्मार्टफोनमध्ये पॉवर म्हणून 6000mAh ची बॅटरी दिली आहे. मोटो जी ६० च्या बॅकला १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. जो अल्ट्रा पिक्सेल सोबत येतो. फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. यात एलईडी फ्लॅशची सुविधा दिली आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः Moto G40 फ्यूजन मध्ये Moto G60 प्रमाणे फीचर्स आहेत. या दोन्ही फोनमध्ये फरक फक्त कॅमेराचा आहे. Moto G40 मध्ये १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्याऐवजी स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा वाइड आणि मायक्रो सेन्सर सोबत ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3an0Lyk
Comments
Post a Comment