Mi 11X Pro ची प्री-बुकिंग सुरू, ४ हजारांची अशी बचत करा, जाणून घ्या किंमत-ऑफर्स

नवी दिल्लीः Pre Booking: हँडसेट निर्माता कंपनी शाओमीने नुकतीच भारतातील ग्राहकांसाठी आपला लेटेस्ट स्मार्टफोन Mi 11X Pro लाँच केला आहे. आज पासून म्हणजेच २४ एप्रिल पासून या हँडसेटची प्री बुकिंग ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनवर आणि कंपनीची अधिकृत वेबसाइट मी डॉट कॉमवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः ज्या ग्राहकांना हा फोन प्री बुकिंग करायचा आहे. त्या ग्राहकांना शिपिंग सुरू झाल्यानंतर हँडसेट मिळणार आहे. स्मार्टफोनमध्ये डॉल्बी एटमॉस सपोर्ट सोबत ड्युअल स्पीकर्स सुरू होणार आहे. जाणून घ्या फोनची लाँच ऑफर्स, किंमत, शिपिंगची तारीख आणि फोनची सर्व खास वैशिष्ट्ये. वाचाः Mi 11X Pro ची भारतातील किंमत शाओमीच्या अधिकृत वेबसाइट डॉट कॉम आणि अॅमेझॉनवर Mi 11X Pro ला प्री ऑर्डर साठी उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, ज्या ठिकाणी केंद्र सरकारने डिलिवरीवर बंदी घातली नाही. त्या ठिकाणी ग्राहकांना हा फोन घरपोच मिळू शकेल. त्या क्षेत्रातील लोक या फोनला प्री ऑर्डर करू शकतात. तुम्ही या फोनला प्री बुकिंग करू शकाल की नाही. याची माहिती लगेच तुम्हाला कळू शकेल. तुमच्या क्षेत्रातील पिन कोड टाकताच तुम्ही हे चेक करू शकता. Mi 11X Pro Pre Order Now या बटनवर क्लिक होत असेल तर याचा अर्थ तुम्ही फोनला प्री बुक करू शकता. मी इंडिया वेबसाइटच्या अनुसार शिपिंग ५ मे पासून सुरू होणार आहे. तसेच अॅमेझॉनच्या माहितीनुसार, स्मार्टफोनची शिपिंग ३ मे पासून सुरू केली जाणार आहे. वाचाः फोनला तीन कलर मध्ये लाँच केले आहे. यात कॉस्मिक ब्लॅक, Celestial Silver आणि फ्रॉस्टी व्हाइट. Xiaomi Mi 11X Pro च्या 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी वेरिएंट ची किंमत ३९ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. तर हँडसेटच्या ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत ४१ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. वाचाः लाँच ऑफर्स हँडसेट सोबत लाँच ऑफर्स दिली जात आहे. अॅमेझॉन आणि मी डॉट कॉम कोणत्याही ऑनलाइन प्लॅटफॉर्म वरून फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकास एचडीएफसी क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ४ हजार रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट मिळू शकते. तसेच अॅमेझॉनवर ग्राहकांना सुविधेसाठी १२ महिन्यापर्यंत विना व्याज ईएमआयची सुविधा देण्यात आली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tQ7sQS

Comments

clue frame