नवी दिल्लीः शाओमीने आज आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 11 Ultra ला भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन सर्वात मोठ्या कॅमेरा सेन्सर्स सोबत येतो. फोनमध्ये सेकंडरी डिस्प्ले सुद्धा दिले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचे लेटेस्ट फ्लॅगशीप स्नॅपड्रॅगन 888 SoC दिले आहे. हे दुसऱ्या अँड्रॉयड फ्लॅगशीप स्मार्टफोन सारखे जसे सॅमसंग गॅलेक्सी एस २१ अल्ट्रा, वनप्लस ९ प्रो आणि विवो X60 प्रो+ या फोनला टक्कर देणार आहे. स्मार्टफोनला गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. वाचाः या इव्हेंट मध्ये शाओमी Mi 11X सीरीजला लाँच करण्यात आले होते. ज्यात दोन स्मार्टफोन्सचा समावेश होता. यात Mi 11X आणि Mi 11X प्रोचा समावेश आहे. दोन्ही फोनची किंमत MI 11 अल्ट्रा पेक्षा जास्त आहे. कंपनीने भारतात शाओमीचा सर्वात मोठा टीव्ही सुद्धा लाँच केला आहे. Mi QLED टीव्ही 75 4K 120Hz पॅनेल सोबत येतो. वाचाः Mi 11 अल्ट्रा ची किंमत भारतात या फोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम प्लस १२८ जीबीचे स्टोरेज मिळते. कंपनीने या फोनला देशात सिंगल व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. शाओमीचा हा फोन महाग आहे, कारण, कंपनीने या फोनला चीनहून आयात केले आहे. चीनमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ६७ हजार रुपये आहे. तर १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७२ हजार ५०० रुपये आहे. १२ जीबी रॅम ५१२ जीबी इंटरन स्टोरेजच्या फोनची किंमत ७८ हजार १०० रुपये आहे. वाचाः फोनचे फीचर्स मी अल्ट्रा एक मोठा स्मार्टफोन आहे. ज्यात ६.८१ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा QHD+ रेजॉल्यूशन सोबत येतो. या फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट दिला आहे. डिस्प्लेत गोरिला ग्लास विक्टस दिले आहे. डिस्प्ले डॉल्बी व्हिजनचा सपोर्ट करतो. फोनमध्ये Harmon कार्डन स्पीकर दिले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 SoC दिले आहे. १२ जीबी रॅम LPDDR5 रॅम दिले आहे. फोनमध्ये ५१२ जीबी रॅमचे स्टोरेज दिले आहे. वाचाः फोनच्या मागे १.१ इंचाचा सेकंडरी डिस्प्ले दिला आहे. कॅमेरा सिस्टम मध्ये प्रायमरी ५० मेगापिक्सलचा सॅमसंगचा GN2 सेंसर दिला आहे. जो OIS, सेकेंड्री ४८ मेगापिक्सल सोनी IMX586 पेरीस्कोप टेलीफोटो लेन्स OIS सोबत येतो. फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा सोनी अल्ट्रा वाइड युनिट दिला आहे. तर फ्रंट मध्ये २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ep2mof
Comments
Post a Comment