नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) स्वस्त प्रीपेड प्लानसाठी प्रसिद्ध आहेत. कंपनी प्रीपेड ग्राहकांसाठी आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी जबरदस्त प्लान ऑफर करीत आहे. रिलायन्स जिओचा एक स्वस्त पोस्टपेड प्लान संबंधी या ठिकाणी तुम्हाला माहिती देत आहोत. या प्लानची किंमत ३९९ रुपये आहे. प्लानमध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंग सोबत Netflix आणि Prime Video सारखे ओटीटी प्लॅटफॉर्मचे सब्सक्रिप्शन सुद्धा फ्री दिले जाते. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान रिलायन्स जिओचा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान अनेक बेनिफिट सोबत येतो. या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जाते. ग्राहकांना प्रत्येक महिन्यात ७५ जीबी डेटा दिला जातो. ज्यात कोणत्याही प्रकारची डेली लिमिट नाही. ७५ जीबी डेटा संपल्यानंतर १० रुपये प्रमाणे १ जीबी डेटा दिला जातो. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Netflix, Prime Video आणि Disney+ Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. याशिवाय, जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः जिओचा ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान पोस्टपेड सोबत कंपनी याच किंमतीत प्रीपेड प्लान सुद्धा ऑफर करते. परंतु, पोस्टपेड प्लानमध्ये मिळणारी सुविधा वेगळी आहे. ३९९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा दिला जातो. या प्रमाणे ३० दिवसांत ४५ जीबी डेटा आणि ५६ दिवसांत ८४ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः प्रीपेड की पोस्टपेड, कोणता जास्त प्लान बेस्ट पोस्टपेडच्या तुलनेत ३९९ रुपयांचा प्रीपेड प्लान तुम्हाला स्वस्त पडतो. हा जवळपास दुप्पट दिवस चालतो. यात डेटा थोडा कमी आहे. परंतु, पोस्टपेड प्लानमध्ये तुम्हाला थोडा एक्स्ट्रा खर्च करावा लागणार असून त्यात Netflix, Prime Video आणि Disney+ Hotstar VIP ची मेंबरशीप मिळत असल्याने या प्लानचे महत्त्व वाढते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3x679nc
Comments
Post a Comment