नवी दिल्लीः जर तुम्ही सोशल मीडियाचा वापर करीत असाल आणि तुम्हाला सोशल मीडिया किंवा व्हॉट्सअॅपवर तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज मेसेज आला असेल तर त्याला चुकूनही ओपन करू नका. त्यावर विश्वास ठेऊ नका. असे केल्यास तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात म्हटले की, Jio, Airtel आणि Vi युजर्सला वर्क फ्रॉम होमसाठी तीन महिन्याचा फ्री रिचार्ज दिला जात आहे. या मेसेजमधून दावा केला जात आहे की, ही स्कीम सरकारकडून दिली जात आहे. वाचाः काय लिहिले मेसेज मध्ये या व्हायरल मेसेज मध्ये लिहिले आहे की, करोना रुग्णांची संख्या वाढली असून सरकारकडून Work From Home साठी ३ महिन्याचे रिचार्ज फ्री दिले जात आहे. जर तुम्ही Jio, Airtel आणि Vi चे सिम कार्ड असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. नोटः खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला फ्री रिचार्ज करा. ............. कृपया लक्ष द्या. ही ऑफर केवळ ३० एप्रिल २०२१ पर्यंत आहे. वाचाः वाचाः या लिंक्सवर क्लि करू नका या मेसेज सोबत देण्यात आलेल्या myrecharge ची लिंक पूर्णपणे फेक आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक पेज ओपन होते. ज्यात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन-आयडियाचा रिचार्ज करण्यासाठी आपले ऑपरेटरची निवड करा. असे म्हटले जाते. त्यानंतर बँक डिटेल्स मागितली जाते. याशिवाय, तुमची पर्सनल माहिती चोरी केली जाऊ शकते. वाचा : ऑनलाइन शिक्षणासाठी फ्री इंटरनेटचा मेसेज सुद्धा व्हायरल एका मेसेज मध्ये COAI आणि PIB Fact Check ने ट्वीट केले होते. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, सरकार अशा पद्धतीची कोणतीही ऑफर देत नाही. PIB Fact Check ने आपल्या ट्वीट मध्ये लिहिले होते की, एक #WhatsApp मेसेज मध्ये दावा केला आहे. सरकार ३ महिन्यासाठी १०० मिलियन युजर्संना फ्री इंटरनेट देत आहे. तुम्हाला जर असा कोणताही मेसेज आला तर त्याला फॉरवर्ड करू नका. तसेच अशा मेसेजला क्लिक करू नका. असे मेसेज आल्यास तात्काळ डिलीट करा. वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QL7Im7
Comments
Post a Comment