नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माता कंपनी आयक्यू इंडिया पुढील आठवड्यात २६ एप्रिल रोजी भारतात आपली नवीन सीरीज iQOO 7 series ला लाँच करणार आहे. या सीरीज अंतर्गत दोन नवीन स्मार्टफोन्स आयक्यू 7 आणि iQOO 7 Legend बाजारात उतरवले जाणार आहेत. लाँचिंगची वेळ अवघ्या दोन दिवसांवर आली असताना आयक्यू ७ ची किंमत लीक झाली आहे. वाचाः ई-कॉमर्स साइट अॅमेझॉन वर खेळत असलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चुकून आयक्यू ७ ची भारतातील किंमत समोर आली आहे. हँडसेटची किंमतीला टिप्स्टर अभिषेक यादवने स्पॉट केले आहे. याची माहिती ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करून दिली आहे. समोर आलेल्या इमेज जर खरी असेल तर iQOO 7 ची किंमत ३४ हजार ९९९ रुपये असू शकते. काही वेळेआधी संकेत मिळाले होते की, हँडसेटची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. वाचाः चे फीचर्स आयक्यू ७ काही दिवसांपूर्वी चीनमधील मार्केट मध्ये लाँच झालेला iQOO Neo 5 स्मार्टफोन असू शकतो. फोनमध्ये ६.६२ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, २०.९ आस्पेक्ट रेशियो आणि १३०० निट्स ब्रायटनेस सोबत याला बाजारात उतरवले जाऊ शकते. स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 SoC सोबत १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज मिळू शकतो. वाचाः iQOO Neo 5 च्या बॅक पॅनेलवर एलईडी फ्लॅश सोबत 48MP Sony IMX598 प्रायमरी कॅमेरा सेन्सर, सोबत १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा सेन्सर असू शकतो. सेल्फीसाटी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. सिक्योरिटी साठी फोनमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असून फोनमध्ये हाय रेंज ऑडियो आणि स्टिरियो स्पीकर्स दिले आहे. फोनला पॉवर देण्यसाठी यात 4400 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली असून ६६ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gHYOQG
Comments
Post a Comment