अॅपलकडून iPhone 12, iPhone 12 mini चे नवीन कलर व्हेरिएन्ट लाँच

नवी दिल्लीः अॅपलने नुकताच आयफोन १२ सीरिज भाग आयफोन १२ आणि आयफोन १२ मिनीचा नवीन पर्पल कलर व्हेरिएंट लॉन्च केला आहे. पर्पल फिनिश या आकर्षक रंगात आता तुम्हाला हा फोन उपलब्ध होणार आहे. हा नवीन रंग आयफोन १२ च्या फ्लॅट ऍल्युमिनिअम एजेसना एक उत्तम आणि आकर्षक उठाव देत असल्याचे कंपनीतर्फे एका रिलीजमध्ये सांगण्यात आले आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये अडवान्सड ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. जे, शक्तिशाली संगणकीय छायाचित्रण उच्च प्रतीचा व्हिडिओ देत असल्याचा दावा करतात. दोन्ही आयफोन मॉडेल्स सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहेत. अॅपल आयफोन १२ मध्ये ६.१ इंच , आयफोन १२ मिनी मध्ये ५.४ इंच स्क्रीन देण्यात आली आहे. वाचाः मॉडेल्समध्ये फ्रंटला सिरॅमिक शिल्ड कॉव्हर देण्यात आले आहे, जे आतापर्यंतच्या आयफोनमधील सर्वाधिक ' ड्युरॅबिलिटी' प्रदान करत असल्याचा दावा आयफोन करतो. दोन्ही आयफोन मॉडेल्स सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहेत. आयफोन १२ हा जगात सर्वाधिक लोकप्रिय आयफोन आहे. आणि आयफोनचा ग्राहक समाधान दर हा देखील ९९ टक्के इतका आहे. स्प्रिंग टाइम मध्ये लौंच करण्यात आलेला हा नवा पर्पल फिनिश रंग लाईनप ला अधिक व्हयब्रण्ट बनवेल व ग्राहकांना हे आवडेल असे आपले वर्ल्ड वाइड मार्केटींगचे वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रेग जोस्वीक यांनी सांगितले. वाचाः उपलब्धता आणि किंमत आयफोन १२ आणि आयफोन १२ मिनी सध्या निळा, हिरवा, काळा, पांढरा, ९ मध्ये उपलब्ध आहे. नवीन पर्पल ६४ जीबी, १२८ जीबी फोनची किंमत ७९ हजार ९०० रुपये तर चीनमध्ये ६९ हजार ९०० रुपये आहे. नवीन व्हेरिएंट २३ एप्रिलपासून पूर्व-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल.तर ३० एप्रिलपासून चीन, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि भारतासह इतर ३० हून अधिक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहील. नवीन मॅगसेफ ऍक्सेसिरीज सर्व आयफोन १२ मॉडेल्सकरीता लेदर केस, डीप व्हायनवीन लेटमधील लेदर स्लीव्ह, कॅपरी ब्लू, पिस्ता, कॅन्टलॉपे किंवा मेथिस्टमधील सिलिकॉन केस किंवा अ‍ॅरिझोनामधील लेदर वॉलेट ऑर्डरकरीता उपलब्ध असतील. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dzt1iY

Comments

clue frame