Google Doodle Earth day 2021: गुगलने खास डूडल साकारून लोकांना दिला हा संदेश

नवी दिल्लीः २२ एप्रिल रोजी दरवर्षी पृथ्वी दिवस () साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे गुगलने याही वर्षी एक खास डूडल साकारले आहे. एक खास डूडल साकारून अर्थ डे निमित्त लोकांना खास संदेश दिला आहे एनिमेटेड डुडल व्हिडिओ द्वारे लोकांनी जास्तीत जास्त झाडे लावून पृथ्वीला वाचवायला हवे, असा संदेश दिला आहे. सर्वात पहिल्यांदा अर्थ डे २२ एप्रिल १९७० रोजी साजरा करण्यात आला आहे. याची स्थापना अमेरिकेचे जेराल्ड नेल्सन यांनी १९७० साली केली होती. याचा उद्देश पृथ्वी व पर्यावरणासंबंधी जागरुक असणे होय. वाचाः गुगलने आज साकारलेले डुडल खास आहे. गुगल पेज ओपन करताच तुम्हाला एक एनिमेटिड Doodle दिसते. ज्यात एक मोठे झाड आणि छोटे छोटे झाडे दिसत आहेत. याशिवाय, मोठ्या झाडाच्या खाली दोन मुले बसलेले दिसत आहेत. हे एनिमेटिड डूडल व्हिडिओ आहे. यावर प्ले करण्यासाठी बटन सुद्धा दिले आहे. डुडल वर प्ले बटनवर क्लिक करताच एक व्हिडिओ प्ले होतो. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक छोटी मुलगी एक झाड लावत आहे. वय वाढत असताना ते झाड सुद्धा मोठ होत आहे. ती वृद्ध झाल्यानंतर एक नवीन झाड न्यू जनरेशनच्या मुलाच्या हातात देते. त्या मुलासोबत ते झाड सुद्धा मोठे होते. गुगलच्या या डूडल द्वारे लोकांना जागरुक करण्यात आले आहे. स्वतः झाडे लावा. आपल्या भविष्यातील पिढीसाठी झाडे लावा. त्यांना प्रेरित करा. आपल्या पिढीसाठी एक निरोगी पृथ्वी निर्माण करा, असा संदेश यातून दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xqgDdg

Comments

clue frame