Gmail चा पासवर्ड विसरला, पठ्ठ्याने थेट गुगलच्या सीईओला केले ट्विट, इंट्रेस्टिंग उत्तर मिळाले पाहा

नवी दिल्लीः आपण बऱ्याचदा आपल्या अकाउंटचा पासवर्ड विसरतो. परंतु, आपण कंपनीकडून देण्यात आलेल्या सपोर्टच्या मदतीने आपला पासवर्ड पुन्हा रिसेट करीत असतो. परंतु, एका व्यक्तीने आपल्या Gmail अकाउंटचा पासवर्ड विसरल्याने एक वेगळाच पराक्रम करून दाखवला आहे. या भारतीय युजरने पासवर्ड विसरल्यानंतर थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मेसेज केला. तसेच त्यांना पासवर्ड रिसेट करण्याची विनंती केली. वाचाः मधन (@Madhan67966174) नावाच्या एका ट्विटर युजरने आपला Gmail पासवर्ड विसरल्यानंतर ट्विट करून सुंदर पिचाई यांच्याकडे मदत मागितली. या युजरने आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, हॅलो सर, तुम्ही कसे आहात?, मला Gmail आयडी पासवर्ड साठी तुमची मदत हवी आहे. मी पासवर्ड रिसेट करण्याची पद्धत विसरलो आहे. कृपया माझी मदत करा. वाचाः युजरने हे ट्विट गुगलचे सीईओ सुंदर पिचाी यांच्या ट्विटर वर कंपनीकडून UNICEF आणि नॉन-प्रॉफिट ऑर्गेनाइजेशन Give India ला COVID-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी १३५ कोटी रुपयांची फंडिंग देण्याची घोषणा करण्यासाठी करण्यात आलेल्या ट्विटला रिप्लाय म्हणून केले होते. सुंदर पिचाई यांच्याकडून काही उत्तर मिळाले नाही. परंतु, काही लोकांनी मधनच्या ट्विटवर मजेदार रिप्लाय केले आहेत. एक युजर (@vaidyab) ने लिहिले की, सध्या सुंदर पिचाई अमेरिकेत आहेत. ज्यावेळी प्रवासावरील निर्बंध हटवले जातील. त्यावेळी ते तुमच्या घरीत येतील. व पासवर्ड रिकवर करण्यास मदत करतील, अपेक्षा आहे की, तुमची दोन वर्षाची प्रतिक्षा समाप्त होवो. जर तुम्हाला चॉकलेट हवे असेल तर लाजू नको, बिनधास्त माग. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा. आणखी एका युजर्ने लिहिले की, हे देवा, तुम्ही दोन वर्षापासून आपला पासवर्ड रिकवर करण्याचा प्रयत्न करीत आहे. गुगलला आता मदत करावीच लागेल. असे वाटत आहे की, मधन दोन वर्षापासून आपल्या जीमेलचा पासवर्ड रिकवर करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे पहिल्यांदा नाही की, त्याने सुंदर पिचाई यांच्याकडे मदत मागितली आहे. याआधी १७ फेब्रुवारी २०२० रोजी एक ट्विट करून मदत मागितली आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3u2U105

Comments

clue frame