२० रुपयांपेक्षा कमी किंमतीत २GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः भारतीय टेलिकॉम बाजारात सध्या टेलिकॉम कंपन्या आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी लागोपाठ प्रयत्न करीत आहे. रिलायन्स जिओने जेव्हापासून टेलिकॉम मार्केटमध्ये पाऊल ठेवले आहे. तेव्हापासून ही स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल सारखी दिग्गज टेलिकॉम कंपनीने युजर्संना स्वस्त रिचार्ज उपलब्ध केले आहेत. वाचाः या तिन्ही कंपनीने काही प्लान्स उपलब्ध केले आहेत. ज्यात डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याची किंमत २० रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लान्समध्ये डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलचा समावेश आहे. वाचाः वोडाफोन-आयडियाचा १९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त प्लान आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्संना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो. याची वैधता २ दिवसांची आहे. एअरटेलचा १९ रुपयांचा प्लान हा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान आहे. यात युजर्संना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. युजर्संना कोणत्याही नटेवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येऊ शकते. या प्लानमध्ये २०० एमबी डेटा दिला जातो. याची वैधता २ दिवसांची आहे. बीएसएनएलचा १८ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या या प्लानची वैधता २ दिवसांची आहे. यात युजर्संना रोज १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच दोन दिवसांत युजर्संना २ जीबी डेटा मिळतो. तसेच युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये १०० एसएमएस दिले जाते. जिओचा ११ रुपयांचा प्लान कंपनीकडून २० रुपयांपेक्षा कमी किमतीचा फक्त एच प्लान ऑफर केला जातो. यात युजर्संना १ जीबी डेटा दिला जाते. याची वैधता प्लानवर अवलंबून आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3aK7Gl9

Comments

clue frame