नवी दिल्लीः सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुक ने घोषणा केली आहे की, भारताीतल आपल्या युजर्संना कोविड १९ च्या लससंबंधी अधिक माहितीसाठी तसेच सेंटर्स पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणार आहे. नुकतेच फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी भारतात आलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी १० मिलियन डॉलर देण्याची घोषणा केली होती. यानंतर कंपनीने देशात वाढलेल्या महामारीला कमी करण्यासाठी मदत करण्याची घोषणा केली आहे. वाचाः टेक जायंटने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, भारतात COVID-19 ची दुसरी लाट आली आहे. त्यात अनेकांना त्रास होत आहे. आम्ही देशातील नागरिकांना चिकित्सा आणि अन्य जीवन रक्षक टूलच्या समर्थनासाठी कटिबद्ध आहोत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या आठवड्यात भारतात आपल्या मोबाइल अॅप वर एक वॅक्सिन फाइंडर टूललो रोलआउट करण्यासाठी केंद्र सरकारसोबत पार्टनरशीप करणार आहे. १७ भाषेत उपलब्ध होणाऱ्या या टूलचा लोकांना लस शोधण्यासाठी फायदा होणार आहे. जवळच्या सेंटरवर पोहोचण्यासाठी मदत मिळणार आहे. वाचाः फेसबुकने म्हटले की, या टूलमध्ये लस केंद्र ठिकाण आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारकडून देण्यात आले आहे. हे टूल वॉक इन पर्याय (४६ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तीसाठी) तसेच नोंदणीकृत आणि CoWIN वेबसाइट वर आपली लसची शेड्यूल्ड आणि अपॉइंटटमेंट मिळवण्यासाठी एक लिंक सुद्धा दाखवण्याचे काम करणार आहे. युजर्स अॅप्लिकेशनवर COVID-19 सूचना केंद्र वरून टूलचा उपयोग करू शकतील. वाचाः झुकरबर्गने सोशल मीडिया प्लॅटफॉरवर पोस्ट करून म्हटलेकी, मी भारतातील प्रत्येकांसाठी विचार करीत आहे. आणि मला आशा आहे की, हा करोना व्हायरस लवकरच नियंत्रणात येईल. फेसबुक युनिसेफ सोबत काम करीत आहे. त्यामुळे लोकांना हे समजण्यास मदत मिळेल. हॉस्पिटल आणि अन्यसाठी १० मिलियन डॉलर दिले आहेत. फेसबुकवर COVID-19 चे लक्षण आणि लसची माहिती मिळवण्यासाठी सेंटर आणि फीड मध्ये माहिती मिळू शकेल. तसेच, इंस्टाग्रामवर फेसबुकवर माहितीला एक्सप्लोर मध्ये गाइड्स द्वारे दिली जात आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gU2xuS
Comments
Post a Comment