नवी दिल्लीः स्मार्ट टीव्ही बनवणाऱ्या Daiwa ने एक नवीन ५० इंचाचा 4K UHD स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. हा टीव्ही Android TV 9 वर बेस्ड BigWall UI वर काम करतो. नवीन लाँच करण्यात आलेल्या स्मार्ट टीव्हीचे मॉडल नंबर D50162FL आहे. या टीव्हीची डिझाइन फ्रेमलेस आहे. कारण, याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो ९६ टक्के आहे. Daiwa 4K UHD स्मार्ट टीव्हीला सध्या केवळ एकाच साइज मध्ये (५० इंच) लाँच केले आहे. स्मार्ट टीव्हीत ईझी कंटेट अॅक्सेस करण्यासाठी व्हाइस कमांड सपोर्ट मिळते. वाचाः Daiwa 4K UHD स्मार्ट टीव्ही मिळणार हे खास फीचर्स Daiwa चा हा टीव्ही 3840x2160 पिक्सल रिजॉल्यूशन सोबत येतो. याचा स्क्रीन साइज १.०७ बिलियन कलर आणि HDR10 सपोर्ट करतो. या स्मार्ट टीव्हीत A55 क्वाड-कोर सीपीयू, Mali-G31 MP2 जीपीयू, 2GB रॅम आणि 16GB ची इंटरनल स्टोरेज दिली आहे. टीव्हीत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, यूट्यूब, डिज्नी प्लस हॉटस्टार, झी ५, सोनी लिव, वूटसह अनेक अॅपचे सपोर्ट मिळणार आहे. कनेक्टिविटीसाठी यात 2.4GHz Wi-Fi, ब्लूटूथ, तीन HDMI पोर्ट, दोन USB पोर्ट, एक ऑप्टिकल आउट पोर्ट, एक ईथरनेट आणि एक हेडफोन जॅक दिला आहे. हा टीव्ही अँड्रॉयड आणि आयओएस अशा दोन्ही डिव्हाइस स्क्रीन मिररिंग सपोर्ट करतो. वाचाः Daiwa 4K UHD Smart TV ची भारतातील किंमत भारतात या टीव्हीची किंमत ३९ हजार ९९० रुपये आहे. या स्मार्ट टीव्हीला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर आणि रिटेल स्टोरवरून खरेदी केले जाऊ शकते. कंपनीने फेब्रुवारी २०२१ मध्ये दोन नवीन स्मार्ट टीव्ही लाँच केले होते. यात ३२ इंच आणि ३९ इंचाच्या टीव्हीचा समावेश होता. Daiwa D32S7B (32 इंच) स्मार्ट टीवी ची किंमत १५ हजार ९९० रुपये आणि Daiwa D40HDRS (39 इंच) स्मार्ट टीव्हीची किंमत २१ हजार ९९० रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gxAEbz
Comments
Post a Comment