boAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर

नवी दिल्लीः प्रसिद्ध ऑडियो प्रोडक्ट बनवणारी कंपनी Boat ने आता आपली स्मार्टवॉच boAt Xplorer ला भारतात लाँच केले आहे. हेल्थ सेन्सरसह या स्मार्टवॉचला तीन रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. या स्मार्टवॉचला तीन रंगात म्हणजेच Pitch Black, Grey आणि Orange Fusion रंगात उपलब्ध केले आहे. इंडियन मार्केटमध्ये याची थेट टक्कर Amazfit Bip U Pro आणि Realme Smart Watch सोबत होणार आहे. वाचाः boAt Xplorer स्मार्टवॉचचे फीचर्स boAt Xplorer स्मार्टवॉचमध्ये खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १.२९ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. सोबत हे वॉटरप्रूफ सुद्धा दिले आहे. यात कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ आणि जीपीएस सेन्सर दिले आहे. या प्रोडक्टच्या बॅटरी बॅकअपचे कौतुक कंपनीकडून करण्यात आले आहे. या स्मार्टवॉच मध्ये 210mAh ची बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ७ ते १० दिवसांपर्यंत बॅटरी बॅकअप मिळणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. वाचाः ही स्मार्टवॉच कस्टमाइज ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे. यात हेल्थ सेन्सरची सुविधा दिली आहे. यात हेल्थ मॉनिटर करणार आहे. सोबत ट्रॅकिंग मोड्सच्या मदतीने ही वॉकिंग, रनिंग, स्विमिंग इत्यादीला मॉनिटर करणार आहे. तसेच यात कॉलिंग, म्यूझिक कंट्रोल सारखी सुविधा दिली आहे. या स्मार्टवॉचमधून हवामानाची माहिती मिळू शकते. तसेच महिलांना मासिक पाळी चे टायमिंगवरून मॉनिटर करू शकते. वाचाः स्मार्टवॉचची किंमत boAt Xplorer Smartwatch ची किंमत ५ हजार ९९० रुपये आहे. कंपनी या स्मार्टवॉचला २ हजार ९९९ रुपयांत विकत आहे. यात ग्राहकांना एक वर्षासाठी वॉरंटी देत आहे. कंपनीकडून ही ऑफर फक्त २० एप्रिल पर्यंतच आहे. यानंतर या स्मार्टवॉचला मूळ किंमतीत खरेदी करावे लागणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QzfLBZ

Comments

clue frame