करोना काळात दिलासा देणारी बातमी, 'या 'रिचार्जवर विमा संरक्षण, 'असा' घ्या लाभ

नवी दिल्ली. विमा संरक्षण खरेदी करायचे म्हटले की आपल्याला एजंटशी संपर्क साधावा लागतो. जणू काही एजंट शिवाय विम्याचे काम पूर्ण होतच नाही हा समाज झाला आहे. परंतु, काही टेलिकॉम कंपनीने अधिक सहज केले आहे .एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया काही प्रीपेडतर्फे काही प्लान सादर करण्यात आले असून यात ग्राहकांना विमा संरक्षण लाभ मिळणार आहे. या कंपन्यांनी काही प्रीपेड पॅक सादर केले आहेत ज्यात वापरकर्त्यांना विमा प्रदान केला जातो. सर्वप्रथम एअरटेलने या प्रकारचा प्लान ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला होता. त्यानंतर व्हीनेही सारखा पॅक सादर केला. यात आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, भारती एएक्सए आणि एचडीएफसी लाइफ इंश्योरन्स या दोन्ही दूरसंचार ऑपरेटरनी भागीदारी केली आहे. चला या विमा प्रीपेड योजनांबद्दल जाणून घेऊया. वाचाः एअरटेल लाइफ विमा प्रीपेड पॅक: याअंतर्गत एअरटेल दोन प्लान देत असून या विभागात १७९ आणि २७९ रुपयांच्या प्लान मिळेल. १७९ रुपयांच्या प्लानबद्धल सांगायचे झाले तर २,००,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देण्यात येत आहे. तसेच, दररोज २ जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर ३०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध असेल. वैधता २८ दिवसांची आहे. सोबत ३० दिवसांसाठी प्राइम मोबाइल मोफत ट्रायल दिले जात आहे. तसेच एअरटेल एक्सस्ट्रीम आणि व्यंक म्युझिकचीही सबस्क्रिप्शन यात मिळेल. वाचाः २७९ रुपयांच्या प्लानमध्ये ४,००,००० रुपयांचे जीवन विमा संरक्षण देण्यात येत आहे. तसेच, दररोज १.५ जीबी डेटा, दररोज १०० एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देखील उपलब्ध असेल. वैधताही २८ दिवसांची आहे. याशिवाय ३० दिवसांसाठी प्राइम मोबाईल एडिशन फ्री ट्रायल दिली जात आहे. तसेच एअरटेल एक्सस्ट्रीम आणि व्यंक म्युझिकचीही सबस्क्रिप्शन मिळेल . इतकेच नाही तर अपोलो २४/७ सर्कलची ३ महिन्यांचे सब्स्क्रिप्शन देण्यात येत आहे. असा मिळवा विम्याचा लाभ विमा संरक्षण मिळवण्यासाठी वापरकर्त्याला त्याच्या एअरटेल क्रमांकावर वरीलपैकी एक रिचार्ज करावा लागेल . यानंतर त्यांना कंपनीच्या वतीने पॉलिसी कार्यान्वित करण्याचा एसएमएस येईल. तपशील नीट वाचून पुढे जा. यानंतर, थँक्स अॅप किंवा कंपनीच्या अधिकृत दुकानात जा आणि विमा तपशील योग्यरित्या भरा. वाचाः वी (व्होडाफोन-आयडिया) जीवन विमा प्रीपेड पॅक: यात दोन प्लान्स आहे. एक, ५१ रुपये आणि दुसरा पॅक ३०१ रुपयांचा आहे. ५१ रुपयांच्या प्लानमध्ये दोन लाभ मिळतील. पहिले तर ५०० एसएमएस आणि दुसरे म्हणजे नियमित उपचारांसाठी १००० रुपयांचे विमा संरक्षण. त्याचबरोबर आयसीयू रूग्णालयात भरतीसाठी दिवसाला २ हजार रुपये दिले जात आहेत. एका वेळी १०दिवस आणि वर्षामध्ये ३० दिवसांचा लाभ यात घेता येईल. ३०१ रुपयांच्या योजनेबद्दल सांगायचे तर यातही वापरकर्त्यांना १००० रुपये किमतीचे हॉस्पि केयर कव्हर देण्यात येत आहे. सोबतच आयसीयू रूग्णालयात भरतीसाठी दिवसाला २ हजार रुपये दिले जात आहेत. एका वेळी १० दिवस आणि वर्षात ३० दिवसांचा लाभ यात मिळविता येतो . या व्यतिरिक्त, दररोज १.५ जीबी डेटा आणि कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग सुविधा प्रदान केली जात आहे. त्याचबरोबर दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. योजनेची वैधता २८ दिवसांची आहे. याशिवाय, व्ही चित्रपट आणि टीव्हीवरही क्लासिक प्रवेश देण्यात येईल. या दोन्ही प्लान्सकरिता कंपनीने आदित्य बिर्ला विमा कंपनीशी हातमिळवणी केली आहे. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tKM7bK

Comments

clue frame