मुंबई-पुण्यात घरपोच मद्यसेवेला फसणुकीची ‘झिंग’

म. टा. प्रतिनिधी, पुणे घरपोच मद्य सेवेसाठी इंटरनेटवर मद्यविक्रीचे दुकान (वाइन शॉप) किंवा मद्यालय (बार) यांचा संपर्क क्रमांक शोधून मागणी नोंदवत असाल आणि पैसे पाठवणार असाल तर थांबा. एकदा त्या क्रमांकाची खातरजमा करा, अन्यथा तुमच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ येऊ शकते. कारण मद्य पुरवण्याच्या बहाण्याने ऑनलाइन गंडा घालणारे ठग सक्रिय झाले असून, फसवणुकीचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. वाचाः राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत, तर मद्यालये पार्सल सेवेसाठी खुली आहेत. अॅपच्या आधारे रेस्टॉरंटमधून जेवण मागवता येते आणि ही सेवा विश्वासहार्य असल्याने फसवणूक होण्याची शक्यता कमी असते. मात्र, मद्य मागवण्यासाठी अशी सोय उपलब्ध नसल्याने नागरिक इंटरनेटवरून दुकानांचा किंवा मद्यालयांचा संपर्क क्रमांक शोधून मागणी नोंदवत असल्याने फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. वाचाः नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका नागरिकाने सांगितले, ‘कर्वेनगर भागातील काही दुकानांचे आणि मद्यालयांचे संपर्क क्रमांक इंटरनेटवरून मिळवले. एका दुकानाशी संपर्क झाला. मी त्यांच्याकडे मागणी नोंदवली. त्यानंतर गुगल पेमार्फत पैसे पाठवले. पैसे मिळेपर्यंत आदराने संवाद साधणारी व्यक्ती त्यानंतर गलिच्छ भाषेत बोलू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे माझ्या लक्षात आले. पैसे परत मागितले, तर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या प्रकाराबाबत मी सायबर सेलकडे तक्रार दाखल करणार आहे. वाचाः ‘इंटरनेटवरील संपर्क क्रमांक खोटे असून, मागवलेले साहित्य मिळत नाही तोपर्यंत कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. अधिकृत अॅप नसेल, तर कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर पैसे पाठवू नका,’ असे आवाहन आर्थिक तोटा सहन केलेल्या एका नागरिकाने केले. मद्यालयांकडून तिप्पट दराने विक्री मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने मद्यालयांचे फावले आहे. दुकानात मिळणारे मद्य अनेक मद्यालयांकडून तिप्पट दराने विकले जात आहे. दीडशे-दोनशे रुपयांची बिअर साडेतीनशे रुपयांना तर, रम व व्हिस्की या मद्यपेयांची विक्री तिप्पट दराने सुरू आहे. मद्यालयात इतर वेळी निवांत बसण्यासाठी; तसेच संगीत व खान-पान सेवेसाठी जादा दर आकारला जातो. मात्र, केवळ पार्सल सेवेसाठी तिप्पट दर आकारून लूट केली जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. ‘मद्यालयांनी जादा दर आकारू नये,’ ही उत्पादन शुल्क विभागाची सूचना मद्यालयांनी टोलवल्याचे दिसत आहे. घरपोच मद्यसेवा अशक्य महापालिकेने आदेशात सुधारणा करून मद्यविक्रीच्या दुकानांना घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. ‘दुकान उघडून घरपोच मद्य सेवा द्यायची; पण समोर गर्दी होऊ द्यायची नाही, हे आमच्या हातात कसे,’ असा सवाल एका विक्रेत्याने उपस्थित केला. दुकान उघडले की पोलिस कारवाई करतात. मद्यविक्रीच्या दुकानांना मनुष्यबळाअभावी घरपोच सेवा देणे शक्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sAAOBj

Comments

clue frame