गुगल, मायक्रोसॉफ्टनंतर अॅपलचा भारताला मदतीचा हात, सीईओंकडून 'ही' मोठी घोषणा

नवी दिल्लीः टेक्नोलॉजीतील गुगल आणि मायक्रोसॉफ्ट नंतर आता आयफोन बनवणारी कंपनी अॅपलने सुद्धा करोना व्हायरसच्या अडचणीचा सामना करण्यासाठी भारतात मदत करण्याचे जाहीर केले आहे. अॅपल कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी म्हटले की, या कठीण परिस्थितीत भारताला मदत करणार आहेत. तसेच भारताला मदतीसाठी रिलिफ फंड जमा करणार आहोत. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी म्हटले की, भारतात कोविड या जागतिक महामारी वाढल्याने आपली कंपनी मेडिकल वर्कर्स सोबत आणि अॅपल कुटुंब त्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीसोबत आहे. जे या करोना विरुद्धच्या लढाईत उतरले आहेत. लोकांची मदत करण्यात येणार असून अॅपल रिलिफ फंड जारी करणार आहे. वाचाः भारतात करोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. कारण, देशात कोविड रुग्णांची संख्या खूप मोठी वाढली आहे. गेल्या काही दिवसांत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. संकटावेळी जगभरातील भागातून भारताला मदत केली जात आहे. याआधी गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सुंदर पिचाईने म्हटले की, भारतात कोविड १९ मुळे परिस्थिती बिघडली आहे. गुगल आणि गुगलर्स गिव्ह इंडिया युनिसेफला मेडिकल सप्लायसाठी १३५ कोटी रुपये फंड म्हणून दिले जाणार आहेत. वाचाः नडेला यांनी म्हटले की, त्यांची कंपनी आपल्याकडून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी एक ट्विट करून म्हटले की, भारतातील ही परिस्थिती पाहून माझे हृदय तुटत आहे. मी भारताची मदत करण्यासाठी अमेरिका सरकारचे आभार मानतो. मायक्रोसॉफ्ट भारतातील या गंभीर परिस्थितीवर शक्य ती मदत करण्यासाठी तयार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ntpsyr

Comments

clue frame