नवी दिल्लीः जर तुम्हाला कमी किंमतीत रिचार्ज करायचा असेल तसेच महिनाभराची वैधता मिळवायची असेल तर तुमच्यासाठी कंपन्यांनी वेगवेगळे प्लान ऑफर केले आहेत. एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडियाचे असे अनेक प्लान आहेत. ज्यात कमी किंमतीत तुम्हाला जास्त डेटा, मोठी वैधता आणि सोबत टॉकटाइमचा लाभ मिळू शकतो. आज आम्ही तुम्हाला १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील रिचार्ज प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Airtel चे १०० रुपयांपर्यंत प्लान्स एअरटेलचे टॉकटाइम प्लान १० रुपयांपासून सुरू होतात. एअरटेलच्या १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत २८ दिवसांची वैधता सोबत यादीत ४५ रुपये, ४९ रुपये, आणि ७९ रुपयांच्या टॉकटाइम प्लानचा समावेश आहे. एअरटेलचे ४९ रुपये, आणि ७९ रुपयांच्या प्लानसोबत १०० आणि २०० एमबी डेटा मिळतो. एअरटेलच्या प्रीपेड नंबरला सुरू ठेवण्यासाठी ४५ रुपयांचा रिचार्ज करणे गरजेचे आहे. तर एअरटेलचा ४९ रुपयांचा डेटा पॅक सोबत २८ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो. वाचाः Vi चा १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्लान Vodafone-Idea सुद्धा आपल्या ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. कंपनी १९ रुपयांचा टॉकटाइमच्या प्लानसोबत २०० एमबी डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा देते. या प्लानमध्ये दोन दिवसांची वैधता देते. वोडाफोन आयडियाचा एक ९९ रुपयांचा प्लान आहे. याची वैधता १८ दिवसांची आहे. या प्लानमध्ये कंपनी १ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देते. याशिवाय ९८ रुपयाचा प्लान असून यात एकूण १२ जीबी डेटा दिला जातो. कंपनीचा ४८ रुपयांचा रिचार्ज प्लान आहे. युजर्संना यात ३ जीबी डेटा दिला जातो. वाचाः Jio चा १०० रुपयांपर्यंत रिचार्ज प्लान रिलायन्स जिओ सुद्धा १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रिचार्ज प्लान ऑफर करीत आहे. पहिला प्लान ५१ रुपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना जबरदस्त ६ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, कंपनीचा एक २१ रुपयांचा प्लान आहे. या स्वस्त प्लानमध्ये ६ जीबी डेटा दिला जातो. यो दोन्ही प्लान टॉप अपचे आहेत. म्हणजेच ग्राहकांना आधी सुरू असलेल्या प्लानसोबत अतिरिक्त डेटा मिळणार आहे. जिओ फोन युजर्संना ७५ रुपयांचा रिचार्ज करता येऊ शकतो. २८ दिवसांची वैधता आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gM8zgO
Comments
Post a Comment