‘भारत बायोटेक’ करणार ७० कोटी डोसचे उत्पादन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली कोव्हिड प्रतिबंधक ‘’ लशीचे दर वर्षी ७० कोटी डोस उत्पादित केले जाणार असल्याचे इंटरनॅशनल लिमिटेडने मंगळवारी म्हटले आहे. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यातच कंपनीला ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. वाचाः ‘निष्क्रिय लस सुरक्षित असली, तरी ती निर्माण करणे अत्यंत गुंतातगुंताचे आणि महाग असते. जिवंत विषाणूंचा वापर करून निर्माण केलेल्या लशीपेक्षा या लशीचे कमी उत्पादन होते,’ असे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. भारतात प्रथमच बीएसएल-३ सुविधा निर्माण झाली असून, त्यामुळे कंपनी कोव्हॅक्सिनची उत्पादन क्षमता अल्पावधीत वाढवू शकते, असेही कंपनीने म्हटले आहे. अन्य देशात कोव्हॅक्सिनची निर्मिती करण्यासाठी कंपनी भागीदार शोधत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. केंद्र सरकारने गेल्या शुक्रवारी भारत बायोटेकला कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यासाठी ६५ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे. एकूण चार कंपन्यांना अनुदान मिळणार असून, त्यात भारत बायोटेकसह हाफकीन इन्स्टिट्यूटचाही समावेश आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eivY6H

Comments

clue frame