वृत्तसंस्था, न्यूयॉर्क गुगल तसेच फेसबुक या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील बड्या कंपन्यांनी डिजिटल जाहिरातींच्या बाजारपेठेत बेकायदेशीररित्या मक्तेदारी निर्माण केली आहे आणि स्पर्धा संपुष्टात आणण्यासाठी ‘जेडी ब्ल्यू’ या टोपणनावाने बेकायदा, गोपनीय करार केला आहे, असा दावा करत अमेरिकेतील ११ राज्यांमधील १२५ वृत्तपत्रांनी सोमवारी न्यायालयांमध्ये धाव घेतली आहे. एकीकडे वृत्तपत्रे व प्रकाशन व्यवसाय मोठ्या आर्थिक संकटात असताना दुसरीकडे त्यांचा लाभ या दोन बड्या कंपन्यांनी घेणे हे योग्य नाही, ही प्रथा तातडीने थांबली पाहिजे, अशी भूमिका वृत्तपत्रांकडून मांडली जात आहे. वाचाः पुलित्झर पुरस्कार विजेत्या चार्ल्स्टन गॅझेट-मेल आणि (हंटिंग्टन) हेराल्ड-डिस्पॅच यांचे प्रकाशन करणाऱ्या वेस्ट व्हर्जिनिया स्थित एचडी मीडिया या वृत्तपत्र कंपनीने जानेवारी २०२१मध्ये गुगल व फेसबुकविरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी टेक्सास, ओहायो, विस्कॉन्सिन आदी ११ राज्यांमधील वृत्तपत्र प्रकाशक कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. वाचाः सीईओ जेरेमी हॅलब्रीच यांच्या नेतृत्वाखालील एआयएम मीडिया, शिकागो सन-टाइम्सचे प्रकाशक, अमेरिकन कन्सॉलिडेटेड मीडियाचे प्रकाशन यांच्यासह विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांनी ही भूमिका घेतली आहे. एआयएम मीडिया टेक्सास, एआयएम मीडिया मिडवेस्ट आणि एआयएम मीडिया इंडियाना यांचाही याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे. वाचाः ‘राज्ये व केंद्रांच्या यंत्रणांनी केलेल्या तपासात याआधी आढळून आल्यानुसार, गुगल आणि फेसबुक यांनी डिजिटल जाहिरातींच्या बाजारपेठेत मक्तेदारी निर्माण केली असून स्थानिक वृत्तपत्रांना व कंपन्यांना स्थानिक बातम्यांसाठी किंमत मिळवण्यापासून रोखले आहे. त्यामुळे स्थानिक वृत्तपत्रविषयक कंपन्यांना मिळणारा महसूल आणि स्रोत यांना मोठा फटका बसला आहे. या मक्तेदारीच्या प्रथा बंद करण्याची गरज आहे. प्रकाशक संकटाला तोंड देत असताना त्यांच्या जिवावर या दोन बड्या व्यासपीठांनी लाभ मिळवणे उचित नाही,’ असे जेरेमी हॅलब्रीच यांनी सांगितले. या मक्तेदारीमुळे केवळ प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यच नव्हे, तर मुळात प्रसारमाध्येच संकटात आली आहेत, अशी भूमिका प्रकाशन संस्था व वृत्तपत्रांनी मांडली आहे. वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QLhUKN
Comments
Post a Comment