करोनाची दुसरी लाट; 'या' कंपनीचे सर्व कर्मचारी घरून काम करणार

वृत्तसंस्था, नवी दिल्ली आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या इन्फोसिसने सर्व कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सूचना केली आहे. कंपनीचे मुख्य कामकाज अधिकारी यू. बी. प्रवीण राव यांनी ईमेलद्वारे ही सूचना सर्व कर्मचाऱ्यांना केली आहे. वाचाः 'कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेपासून बचाव करा' या शीर्षकाचा ईमेल प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रवीण राव यांनी पाठवला आहे. या ईमेलमध्ये राव यांनी देशात सातत्याने वाढणाऱ्या करोना रुग्णांची दखल घेऊन चिंता प्रकट केली आहे. प्रवीण राव यांनी म्हटले आहे की, तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य द्या. मास्कविना घराबाहेर पडू नका, सुरक्षित वावराची सवय लावून घ्या, गर्दीत जाणे टाळा तसेच बंदिस्त जागांमध्येही जाणे टाळा. अगदी आवश्यक नसेल तर घराबाहेर जाणेही टाळा, असा सल्ला राव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. वाचाः व्यवसाय सातत्य आराखडा (बीसीपी) चमूचा भाग नसलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी घरून काम करावे, अशी सूचना करतानाच ही सूचना इन्फोसिसच्या सर्व शाखांना लागू असल्याचेही राव यांनी नमूद केले आहे. अत्यावश्यक कामांचा निपटारा करण्यासाठी कार्यालयात येणे गरजेचे असल्यास सर्व प्रकारची खबरदारी घेऊनच यावे. तसेच बीसीपी चमूतील कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काम करताना कर्मचारी निगा केंद्रांत किंवा वसतिगृहांतच राहावे, घरी जाऊ नये असेही राव यांनी सुचवले आहे. वाचाः कर्मचाऱ्यांनी ते वयानुसार पात्र असतील तर लसीकरम करून घ्यावे. असे लसीकरण स्वेच्छेने करायचे असले तरी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. वाचाः इन्फोसिसची चतुःसूत्री - घरी राहा, घरूनच काम करा - आरोग्यविषयक सूचनांचे पालन करा - पात्र असाल तर कोविड लस घ्या - करोनाच्या दुसऱ्या लाटेपासून स्वतःचा बचाव करा वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sAAUsR

Comments

clue frame