ई-मेल आयडी, सॉफ्टवेयर, मेडिकलसंबंधीसह 'ही' माहिती गुगलवर कधीच सर्च करू नका

नवी दिल्लीः करोना काळ सुरू असून लोक मानसिक तणावाखाली आहेत. बाहेर पडणे आता मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनेक जण आपल्या स्मार्टफोनवरून अनेक काम करीत आहेत. परंतु, गुगलवर काहीही शोधणे चांगलेच महागात पडू शकते. गुगलवर काही गोष्टी जाणीवपूर्वक सर्च करू नये, कारण अनेक जण या ठिकाणी टपून बसलेले आहेत. वाचाः आपल्या ई-मेल आयडीला सर्च करू नका गुगलवर आपल्या स्वतःच्या ई-मेल आयडीला कधीच गुगलवर सर्च करू नका. असे केल्यास तुमचे अकाउंट हॅक आणि पासवर्ड लीक केले जाऊ शकते. तसेच तुम्ही कोणत्या तरी स्कॅममध्ये फसू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून नेहमी सल्ला दिला जातो की, ई-मेल आयडी सर्च करू नका. वाचाः URL नेहमी तपासून पाहा कोणत्याही बँकिंग वेबसाइटवर जाण्याआधी त्याचा यूआरएल तपासून पाहा. अनेकदा हॅकर्स बँकासारखी दिसणारी वेबसाइट तयार करीत असतात. जर तुम्ही त्या लिंकला ओपन केल्यास त्या लिंक मध्ये आपली डिटेल भरल्यास तुमचे अकाउंट खाली होऊ शकते. हॅकर्सने सरकारी वेबसाइट्सच्या नावाने फेक वेबसाइट बनवली आहे. याचा यूआरएल नेहमी तपासून पाहा. त्यात एक शब्द मागेपुढे केलेला असतो. वाचाः मोबाइल अॅप किंवा सॉफ्टवेयर गुगल सर्चद्वारे अनेकदा फिशिंग किंवा फेक अॅप्स आणि सॉफ्टवेयर आपण डाउनलोड करीत असतात. परंतु, हे डिव्हाइसला नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे अॅपला गुगल प्ले स्टोर किंवा अॅप स्टोरवरून डाउनलोड करा. कोणतेही सॉफ्टवेयर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करा. वाचाः कस्टमर केयर नंबर सर्च करू नका अनेकदा कंपनीच्या कस्टमर केयर (Coustmer Care) ची माहिती आपल्याकडे नसते. त्यामुळे आपण गुगलवर सर्च करीत असतो. परंतु, गुगलवर कोणत्याही कंपनीचा कस्टमर केयर सर्च करू नका. जर अशा नंबरवर कॉल कराल तर तुमचा नंबर हॅकर्सकडे पोहोचू शकतो. हॅकर्स तुमच्या नंबरवर कॉल करून सायबर क्राइम करू शकतात. ज्यात सिम स्वॅप सारख्या घटनेचा समावेश आहे. कस्टमर केयर नंबर हवा असेल तर अधिकृत साइटवरून घा. ते सुरक्षित आहे. वाचाः मेडिकल सल्ला आजारी पडल्यानंतर जवळच्या डॉक्टर कडे किंवा आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. कोणत्याही आजारासंबंधी किंवा औषधासंबंधी गुगल सर्च करू नका. असे केल्यास तुम्हाला चुकीची औषधे मिळू शकतील. हे तुमच्या आरोग्याला नुकसानकारक आहे. स्टॉक मार्केटचा सल्ला गुगलवर सीरीयस फायनान्स आणि स्टॉक मार्केटचा सल्ला संबंधी गुगलवर कधीच सर्च करू नका. गुगलवर सर्च तुम्हाला कोणतीही विश्वसनीय स्त्रोत मिळू शकणार नाही. उलट तुम्हाला नुकसान सोसावे लागू शकते. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eGQtKN

Comments

clue frame