नवी दिल्लीः भारतात करोना व्हायरसचा कहर आहे. रोज रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्युमुखींची संख्या सुद्धा कमी होताना दिसत नाही. या दरम्यान, भारताला मदत करण्यासाठी अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या दरम्यान, गुगलनेही भारताच्या मदतीसाठी घोषणा केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) ने ट्वीट करून याची माहिती दिली आहे. वाचाः गुगलकडून १३५ कोटी रुपये फंड देण्याची घोषणा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) ने ट्वीट करून म्हटले की, भारतात सध्याची परिस्थित बिकट झाली आहे. कोविड संकटात भारतात गुगलकडून १३५ कोटी रुपयांची फंडिंग दिली जाणार आहे. तसेच युनिसेफला मेडिकल सप्लायसाठी, हाय रिस्कची कम्यूनिटीचा सपोर्ट करणाऱ्या संघटना आणि महत्त्वपूर्ण माहिती देण्यात मदत करणाऱ्याला ग्रँट म्हणून देत आहे. वाचाः २४ तासात ३.५३ नवीन करोना रुग्ण २८१२ मृत्यू केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात भारतात ३ लाख ५२ हजार ९९१ करोना रुग्ण संक्रमित झाले आहे. तर २४ तासात २८१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतात करोना रुग्णांची संख्या १ कोटी ७३ लाख १६४ इतकी झाली आहे. तर १ लाख ९५ हजार १२३ लोकांचा करोनामुळे जीव गेला आहे. वाचाः देशातील अॅक्टिव रुग्ण २८ लाखांच्या पलिकडे आकडेवारीनुसार, भारतात आता पर्यंत कोविड १९ ने १ कोटी ४३ लाख ०४ हजार ३८२ लोक करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. देशात सध्या २८ लाख १३ हजार ६५८ लोकांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dR6iz5
Comments
Post a Comment