या ४६ शहरात स्मार्टफोन, टॅबलेटसाठी पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस

नवी दिल्लीः भारतामधील सर्वात विश्वसनीय कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन ब्रॅण्ड, सॅमसंगने आज देशामध्ये मोबाईल डिव्हाईससाठी नवीन पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिस देऊन ती देत असलेल्या तीच्या विनासंपर्क सर्व्हिसचा विस्तार केला. सॅमसंग सर्व्हिस सेंटरला भेट देणारे ग्राहक सुद्धा दुरूस्तीनंतर त्यांच्या घरी त्यांचे मोबाईल फोन मिळण्यासाठी ड्रॉप-ओन्ली सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतात. यामुळे सॅमसंग स्मार्टफोन आणि टॅबलेट कंज्युमर्सला त्यांचे डिव्हाईस सर्व्हिस करून घेण्यासाठी त्यांच्या घरच्या सुरक्षा आणि आरामातून बाहेर पडावे लागत नसल्याची खात्री केली जाईल. वाचाः मोबाईल डिव्हाईसची पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिसने ४६ शहरात आपले पाऊल टाकले आहे - दिल्ली, गुडगाव, मुंबई, कोलकात्ता, चेन्नई, पुणे, बँगलोर, आग्रा, लखनऊ, वाराणसी, डेहराडून, गुवाहटी, भुवनेश्वर, पटना, दुर्गापुर, रांची, ठाणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सूरत, वडोदरा, भोपाळ, इंदुर, रायपुर, राजकोट, जबलपूर, कोईंबतुर, मदुराई, कोचि, कॅलिकट, तिरूपती, हुबळी, हैदराबाद, विजयवाडा आणि विशाखापट्टणम - महानगरपालिकेच्या मर्यादेत येणाऱ्या कंटेनमेंट नसलेल्या क्षेत्रांसाठी आणि कर्फ्यू च्या सर्व नियमांचे पालन करून. वाचाः ग्राहक त्यांच्या गॅलक्सी ए, गॅलक्सी एम, गॅलक्सी एस, गॅलक्सी एफ, गॅलक्सी नोट आणि गॅलक्सी फोल्ड सीरिज स्मार्टफोन्स तसेच टॅबलेटसाठी सर्व्हिसची नोंदणी करू शकतात. ग्राहकांच्या घरून डिव्हाईस पिक-अप आणि ड्रॉप करणारे व्यक्ती सर्व सुरक्षा प्रोटोकॉल्सचे पालन करतील. मोबाईल डिव्हाईस दुरूस्तीसाठीची पिक-अप आणि ड्रॉप आणि केवळ ड्रॉप सर्व्हिसचा अनुक्रमे १९९ रू. आणि ९९ रू. च्या नाममात्र शुल्कामध्ये लाभ घेतला जाऊ शकतो. ग्राहक अनेक डिजिटल पेमेंट पर्यायांमधून सर्व्हिससाठी पेमेंट करू शकतात. वाचाः सॅमसंग मध्ये, ग्राहकांचे आरोग्य सर्वात मोठे प्राधान्य आहे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटूंबांना सोय देण्यासाठी पाऊल उचलण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. नवीन पिक-अप आणि ड्रॉप आणि केवळ ड्रॉप सर्व्हिसमुळे ग्राहक खास करून सध्याच्या परिस्थीतीत, त्यांच्या घरून बाहेर न पडता त्यांच्या मोबाईलची सर्व्हिस करून घेऊ शकतील. आमचे व्यापक सर्व्हिस नेटवर्क आणि बरेच विनासंपर्क सर्व्हिस पर्याय ग्राहकांना मोठ्या सोयीसह जोडून राहाण्यास मदत करतील याचा आम्हाला विश्वास आहे. ग्राहक त्यांच्या घरी राहून आणि सुरक्षित राहून पिक-अप आणि ड्रॉप सर्व्हिसचा लाभ घेतील अशी आम्हाला आशा आहे, असे सॅमसंग इंडियाचे ग्राहक सेवा, उपाध्यक्ष सुनिल क्युटिन्हा म्हणाले. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32ubrXt

Comments

clue frame