मंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण; पाहा लाइव्ह

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मंगळ ग्रहावर पाठवण्यात आलेला नासाचा हेलिकॉप्टर Ingenuity आज पहिल्यांदा उड्डाण करणार आहे. जवळपास सहा वर्षांच्या मेहनतीनंतर तयार करण्यात आलेल्या या हेलिकॉप्टरच्या उड्डाणाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. नासाकडून या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वजनाने अतिशय हलके असणारे नासाचे Ingenuity हेलिकॉप्टर सोमवारी आपल्या उड्डाणाचा प्रयत्न करणार आहे. या ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी ३.४५ वाजता याचे थेट प्रसारण होईल. लाइव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा: नासाच्या शास्त्रज्ञांना सतावतेय चिंता नासा टीव्हीवरही ही ऐतिहासिक घटना पाहता येईल. याच दरम्यान नासाच्या शास्त्रज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हेलिकॉप्टर प्रोजेक्ट मॅनेजर मिमी आंग यांनी सांगितले की, आमची टीम सोमवारी मंगळ ग्रहावर उड्डाण घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी झाल्यास आम्हाला पु्न्हा दुसऱ्यांदा प्रयत्न करावा लागणार असल्याची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: आंग यांनी म्हटले की, अभियांत्रिकी जगतात नेहमीच अनिश्चितता असते. मात्र, ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम करणे रोमांचकारी असते. हेलिकॉप्टरचे उड्डाण याआधी ११ एप्रिल रोजी होणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव हे उड्डाण टाळण्यात आले. हेलिकॉप्टरचे सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आले आहे. मोहीम यशस्वी ठरेल! १६ एप्रिल रोजी मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, हेलिकॉप्टरने रॅपिड स्पिन चाचणी यशस्वी केली आहे. आता या हेलिकॉप्टरला मंगळावरील वातावरणात उड्डाण घ्यावे लागणार आहे. नासाने दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतल्यानंतर काही अंतर फिरण्यास यशस्वी झाले तरी या मंगळ मोहिमेला मोठे यश मिळणार आहे. हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतरही कार्यरत असल्यास आणखी चार उड्डाण केले जाऊ शकते.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ecMCER

Comments

clue frame