मस्तच!, Alexa सांगणार COVID-19 ची लस कुठे मिळणार, खास फीचर रोलआउट

नवी दिल्लीः संपूर्ण देशात करोना व्हायरस (Coronavirus) मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे कोविड लस घेण्यासाठी अनेकांना प्रोत्साहन केले जात आहे. लस घेण्यास असुविधा मिळू नये यासाठी वेगवेगळ्या कंपन्या मदतीसाठी पुढे येत आहेत. आता या यादीत Amazon ने युजर्संसाठी कोविड लसची सहज माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने खास फीचर्स लाँच केले आहे. वाचाः अॅमेझॉनने शुक्रवारी माहिती दिली की, त्यांची अलेक्सी व्हाइस असिस्टेंट आता लोकांना कोविड लस संबंधित माहिती देणार आहे. जवळचे सेंटर कोणते. तिथपर्यंत कसे पोहोचायचे यासंबंधी सर्व माहिती आता अलेक्सा देणार आहे. शिवाय, ८५ हून अधिक देशात लस उपलब्ध आणि एलिजिबिलीटी संबंधी प्रश्नांची उत्तरे देणार आहे. हे सर्व जवळच्या COVID-19 टेस्ट ठिकाणाला शोधण्यास मदत करणार आहे. वाचाः तुम्हाला कोविड लस कुठे मिळू शकेल? अॅमेझॉन Where can I get a ? फीचरला रोलआउट केले जात आहे. सध्या अलेक्सा अमेरिकेसाठीचे फीचरवर सपोर्ट करणार आहे. वेगवेगळ्या राज्यातील लोक प्रश्न विचारू शकतात. अलेक्सा, मला कोविडची लस कुठे मिळू शकते?, किंवा कोविड सेंटरच्या संबंधित संपूर्ण माहिती निवडू शकतात. अलेक्सा मला सिएटल मध्ये COVID ची लस कुठे मिळू शकते?, यानंतर अलेक्सा जवळच्या कोविड सेंटरसंबंधी माहिती देणार आहे. अॅमेझॉनने म्हटले की, अलेक्सा लोकांना लस किंवा अपॉइंटमेंट उपलब्ध करण्यसासंबंधी एक स्पेशल लोकेशन सोबत जोडण्यास मदत करणार आहे. ही सुविधा सध्या केवळ अमेरिकेपर्यंत मर्यादीत आहे. अॅमेझॉन लवकरच या फीचरला भारतात आणणार आहे. वाचाः भारत सरकारने लस मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली आहे. कोविड १९ चे प्रकरणे खूप वाढली आहेत. त्यामुळे देशातील १८ वर्षावरील नागरिक १ मे पासून लस घेण्यास पात्र असणार आहेत. त्यामुळे अशा वेळी टेक्नोलॉजीच्या मदतीने कोविड लस सेंटर पर्यंत जाण्यास मदत मिळू शकणार आहे. वाचाः कोविड-१९ साठी कुठे टेस्ट करू शकतो? भारतात अलेक्साची जवळचे कोविड टेस्ट लोकेशन शोधण्यास मदत मिळत आहे. अलेक्सा टेस्ट लोकेशनसंबंधी विचारल्यानंतर ती आपल्याला सांगते की, कुठे टेस्ट करू शकता. यासाठी तुम्हाला टेस्ट सेंटर्सची यादी सांगितले जाते. यासाठी तुम्ही क्वेरीच्या हिशोबाप्रमाणे टेस्ट सेंटर पर्यंत जाऊ शकता. अॅमेझॉन शिवाय, गुगल सर्च सुद्धा कोविड १९ लस च्या अपडेट सह कोविड संबंधित अनेक माहिती उपलब्ध करण्यासाठी काम करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gBVuXA

Comments

clue frame