६ हजारांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करा 7000mAh बॅटरीचा सॅमसंगचा हा स्मार्टफोन

नवी दिल्लीः ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर २ मे पासून Big Saving Days Sale सुरू होणार आहे. हा सेल ७ मे पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान, अनेक स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, अॅसेसरीज, होम अप्लायन्सेज आदीवर डिस्काउंट उपलब्ध केले जाणार आहे. स्मार्टफोनवर या सेलमध्ये डिस्काउंट मिळणार आहे. या सेलमध्ये २३ हजार ९९९ रुपये किंमत असलेला हा स्मार्टफोन १७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खेरदी करू शकता. या फोनवर ६ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट दिला जात आहे. वाचाः Samsung Galaxy F62 वर ऑफर्स या सेलमध्ये अनेक ऑफर्स दिली जात आहे. परंतु, ही ऑफर HDFC बँक कार्डवर आहे. या ऑफर अंतर्गत युजर HDFC बँक कार्डवरून पेमेंट करीत असेल तर त्याला १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट दिला जाणार आहे. याशिवाय, ही ऑफर EMI ट्रांजेक्शनवर सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच एक्सचेंज ऑफर, नो कॉस्ट ईएमआय दिली जाणार आहे. वाचाः फोनची किंमत या फोनची किंमत २३ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. Big Saving Days Sale दरम्यान या फोनला १७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची ही किंमत आहे. तर ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २५ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः फोनची फीचर्स या फोनमध्ये ६.७ इंचाचा FHD+ Super AMOLED+ दिला आहे. याचा पिक्सेल रिझॉल्यूशन 2400x1080 आहे. यात ग्राफिक्ससाठी ARM Mali G76 MP12 दिले आहे. हा फोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. या फोनला दोन स्टोरेज मध्ये ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केलेले आहे. या फोनमध्ये ७००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dZFtck

Comments

clue frame