एलपीजी सिलेंडरवर मिळवा ८०० रुपयांपर्यतचा कॅशबॅक, ऑफर 30 एप्रिल पर्यंत

नवी दिल्ली एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगः नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीलाच एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत १० रुपयांनी कपात करण्यात आली. कपातीनंतर आता मुंबईत विनाअनुदानित १४.२ किलो सिलिंडरची किंमत ८०९ रुपये इतकी आहे. जर तुम्हीसुद्धा घरासाठी गॅस बुकिंग करणार असाल तर सिलिंडर बुकिंगवर तुम्ही कॅशबॅक कसं मिळवू शकता हे जाणून घ्या. पेटीएमच्या माध्यमातून गॅस बुकिंगवर ८०० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक देण्यात येत आहे, त्या ऑफरशी संबंधित हि विशेष माहिती. असा मिळवा पेटीएमवर कॅशबॅक १. सर्वप्रथम फोनमध्ये पेटीएम उघडा, लक्षात ठेवा की अ‍ॅपमधेय लॉग इन करावे लागेल. २ यानंतर अ‍ॅपच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला माय पेटीएम विभागात लिहिलेल्या सर्व सेवा दिसतील. त्यावर क्लिक करा. ३. सर्व सेवांवर टॅप केल्यानंतर तुम्हाला रिचार्ज व पे बिल विभागात जायचे आहे. ४. यात तुम्हाला बुक सिलेंडरचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. ५. बुक सिलेंडरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गॅस प्रदाता भारत गॅस, एचपी गॅस किंवा इंडेनमधून निवडावा लागेल. ६ .गॅस प्रदाता निवडल्यानंतर, एललपीजी आयडी किंवा गॅस एजन्सीमध्ये नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि पुढे क्लिक करावे लागेल. पेटीएम वर सूचीबद्ध केलेल्या ऑफरनुसार ही ऑफर पेटीएम अपच्या माध्यमातून प्रथम गॅस सिलिंडर बुकिंगवर लागू होईल आणि या ऑफरअंतर्गत ८०० रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळू शकेल. जेव्हा आपण पेटीएमद्वारे प्रथम गॅस सिलिंडर बुक करता तेव्हा ऑफर ऑटोमॅटिक लागू होईल. ही ऑफर किमान ५०० रुपयांच्या बिल पेमेंटवरच लागू होईल आणि एकदाच या ऑफरचा लाभ घेता येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पेटीएम ऑफर फक्त ३० एप्रिल २०२१ पर्यंत आहे, कॅशबॅकसाठी तुम्हाला पेमेंटनंतर एक स्क्रॅच कार्ड मिळेल, कॅशबॅक १० ते ८०० रुपयांपर्यंत कुठेही असू शकेल. पेमेंट केल्यानंतर आपण स्क्रॅच कार्ड उघडले नाही तर कॅशबॅक आणि ऑफर्स विभागात जाऊन आपण ते उघडू शकता. प्रत्येक स्क्रॅच कार्ड ७ दिवसात एक्स्पायर होईल. म्हणून स्क्रॅच कार्ड ७ दिवसांपूर्वी वापरावी लागेल. स्क्रॅच कार्ड स्क्रॅचिंगच्या ४८ तासात आपल्याला कॅशबॅक मिळेल. टीप : पेमेंट करण्यापूर्वी ऑफरशी संबंधित सर्व महत्वाची अवश्य माहिती वाचा.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vaGeF3

Comments

clue frame