नवी दिल्लीः पॉपुलर स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आपला ब्रँड MIJIA ची नवीन वॉशिंग मशीन MIJIA Smart Pulsator Washing Machine लाँच केली आहे. याची क्षमता १० किलोग्रॅम आहे. होम अप्लायन्स सेगमेंट मध्ये एसी, फॅन सह अन्य प्रोडक्ट्स लाँच केल्यानंतर आता शाओमीने जास्त क्षमता असलेले वॉशिंग मशीन आणली आहे. याआधी मिजियाची ३ किलोग्रॅम, ५ किलोग्रॅम आणि ८ किलोग्रॅमची वॉशिंग मशीन होती. आता जास्त अडवान्स्ड आणि लेटेस्ट फीचर्स असलेले एनएफसी इनेबल्ड वॉशिंग मशीन लाँच केली आहे. ज्यात एकत्र ६० हून जास्त कपडे धुता येतात. गेल्या काही दिवसात शाओमीच्या मिजिया ब्रँडने चीनमध्ये नवीन एसी सुद्धा लाँच केला होता. वाचाः किंमत खूपच कमी Home Appliance सेगमेंट मध्ये नवीन एंट्री MIJIA Smart Pulsator Washing Machine ला चीनमध्ये 1,599 युआन म्हणजेच 17,750 रुपयात लॉन्च केले आहे. सध्या प्री ऑर्डरमध्ये याची किंमत केवळ १०९९ युआन म्हणजेच १२ हजार २०० रुपये ठेवण्यात आली आहे. लवकरच भारतात याला लाँच करण्यात येऊ शकते. वाचाः काय आहे खास शाओमीचा दावा आहे की, MIJIA Pulsator Washing Machine 10kg मध्ये एकत्र ४८ शर्ट, ४ चादर, १६ जिन्स, ४ बेडशीट सह अनेक कपडे धुता येऊ शकतात. मिजियाच्या या वॉशिंग मशीनध्ये अनेक खास फीचर्स दिले आहेत. सर्वात खास म्हणजे यात सेल्फ क्लिनिंग आणि एअर ड्राइंग सपोर्ट दिला आहे. यानंतर यात १६ प्रोफेशनल वॉशिंग प्रोग्राम्स दिले आहे. ज्यात वेगवेगळ्या पद्धतीने कपडे धुवू शकतात. MIJIA App च्या मदतीने याला कंट्रोल करू शकता. या स्मार्ट वॉशिंग मशीला आपल्या घरात कधीही ऑन ऑफ करू शकतात. लूक आणि बिल्ड क्वॉलिटी संबंधी दावा केला जात आहे की, हे खूप मजबूत आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lXLYyl
Comments
Post a Comment