Symphonyची उन्हाळ्यात थंड हवेसाठी नवी मोहीम सुरू

मुंबई : या जगातील सर्वांत मोठ्या एअर कूलर उत्पादक कंपनीने 'मन थंडा तन ताजा रहे’ हे हृदयस्पर्शी अभियान सुरू केले आहे . ताजी आणि थंड हवा लोकांना आयुष्यात एक नवीन दृष्टिकोन देऊ शकते यावर प्रकाश टाकणाऱ्या एका ब्रॅण्ड फिल्मच्या माध्यमातून ब्रॅण्डने अभियानाचा शुभारंभ केला आहे . एप्रिलमधील कडक उन्हाळा तोंडावर असल्यामुळे भारतीय ग्राहकांच्या मनांना या जाहिरातीद्वारे स्पर्श करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे . ही जाहिरात मराठी , तमीळ , तेलुगू , कन्नडा , मल्याळम , ओडिया आणि बंगाली अशा अनेक भाषांच डब करण्यात आली आहे . या थ्रीसिक्स्टी डिग्री अभियानाचा प्रसार टेलीव्हिजन , डिजिटल , रेडिओ , ओओएच आणि अन्य माध्यमांतून केला जाणार आहे .वाचाः आपल्या वाढदिवशी एक स्त्री घरात प्रवेश करते आणि ताजीतवानी हवा तिचे स्वागत करते अशी गोष्ट या जाहिरातीतून सांगण्यात आली आहे. ती घरात प्रवेश करते तेव्हा सर्वत्र भेटवस्तू विखुरलेल्या असतात, तिच्या नवऱ्याने प्रत्येक खोली भेटवस्तूंनी सजवलेली असते. बेडरूममध्ये नवरा तिला शुभेच्छा देतो आणि तिच्या हातात दिसणाऱ्या कागदांबद्दल तिला विनोदाने विचारतो. ती घटस्फोटाची कागदपत्रे आहेत असे तिने सांगूनही तो ते हसण्यावारी नेतो. मात्र, ती ते कागद एका हॅम्परमध्ये घालून फेकून देताना दिसते, कारण, ती नवरा करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेते. या नात्यात अजूनही काही शिल्लक आहे असे तिला वाटते, तिच्या मनाला थंडावा लाभल्यानंतर तिला एक नवीन दृष्टिकोन प्राप्त होतो; ताजी हवा एखाद्याच्या आयुष्यात नवीन अध्याय सुरू करू शकते असा संदेश त्याचवेळी येतो. वाचाः भारतातील तापमानात वाढ होऊन लवकर उन्हाळा जाणवू लागल्याने एअर कूलर ही काळाची गरज ठरत आहे. सिम्फनी एअर कूलर्सची विस्तृत श्रेणी देऊ करते. यांमध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक एअर कूलर्सचा समावेश आहे. ही उत्पादने हलवण्याजोगी, टिकाऊ स्वरूपाची आणि अत्यंत किफायतशीर आहेत. या श्रेणीतील एअर कूलर्सची किंमत ५,२९९ रुपयांपासून सुरू होते आणि ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर व अन्य ई-कॉमर्स पोर्टलवर तसेच आघाडीच्या रिटेल दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31aEzm0

Comments

clue frame