Symphony Air Coolers कडून 'सिम्फनी का मोविकुल' नवी मोहीम सुरू

मुंबई: सिम्फनी लिमिटेड या भारताच्या जागतिक एअर- कुलिंग कंपनी आणि एअर-कुलर्सच्या जगातील सर्वात मोठ्या उत्पादक कंपनीने 'सिम्फनी का मोविकुल' ही नवी मोहीम लाँच केली आहे. मोठ्या घरांसाठी आणि घराबाहेरील वापरासाठी तयार करण्यात आलेल्या त्यांच्या नव्या कुलर्सची व्यावसायिक रेंज सादर करण्यासाठी ही मोहिम सूरु करण्यात आली आहे. गुंतवून ठेवणाऱ्या जिंगलच्या माध्यमातून भारतीय ग्राहकांशी जोडले जाण्याचा उद्देश या राष्ट्रीय पातळीवरील या टीव्हीसीमागे आहे. येत्या उन्हाळ्यासाठी अगदी सुयोग्य असलेले तांत्रिकदृष्ट्या आधुनिक अशा मोविकुल एअर कुलर्सची नवी रेंज या जाहिरातीत दाखवण्यात आली आहे. वाचाः विविध ठिकाणी, विविध कार्यक्रमांमध्ये असलेल्या अनेक व्यक्तिरेखा दिसतात अशी या जाहिरातीची सुरुवात आहे. ही सगळीच माणसं उन्हाळ्याने प्रचंड बेजार झाली आहेत. या अशा नकोशा वातावरणाचा सामना करण्यासाठी खास मोठ्या जागांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेले सिम्फनीचे मोविकुल एअर कुलर्स येतात. जाहिरातीत पार्श्वसंगीत म्हणून 'जब भी जहां भी करना हो कुल, सिम्फनी का मोविकुल...' हे मजेशीर गीत सुरू होतं आणि हवेत आलेल्या या बदलामुळे सगळीच माणसं आनंदी, ताजीतवानी आणि उत्साही होऊन नाचू लागतात. वाचाः सिम्फनी मोविकुल एअर कुलर्सची रचना उच्च परफॉर्मन्स असलेल्या कुलिंगसाठी करण्यात आली आहे. यातील दमदार, कोणत्याही मोसमात सुयोग्य राहणारी बॉडी आणि सहज वाहून नेता येण्याची सोय यामुळे हे एअर कुलर्स आऊटडोअर लग्न किंवा कार्यक्रम, वर्कशॉप्स, रेस्तराँ, रीसॉर्ट्स, कॅफे, जीम्स, प्रार्थनास्थळे, वर्कशॉप्स, शाळा आणि इतर प्रकारच्या व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी योग्य ठरतात. मोठे निवासी व्हिला आणि मोकळ्या मैदानांसारख्या मोठ्या जागांमध्ये स्थिर आणि योग्य तापमान राखण्यासाठीसुद्धा हे कुलर्स योग्य आहेत. वाचाः ९० च्या दशकात जिंगल अॅड्स फार प्रसिद्ध होत्या. काही लोकप्रिय स्लोगन्स तर आपल्याला आजही आठवतात. त्या स्लोगनसोबत ग्राहकांना ते ब्रँडही आठवतात. सिम्फनी का मोविकुल जिंगल प्रेक्षकांच्या मनाची अशी तार छेडण्यासाठीच रचण्यात आले आहे. हे साधे मात्र लक्षवेधी संगीत बऱ्याच विचारविनिमयातून आलं आहे. लोकांना बराच काळ लक्षात राहील, असं काहीतरी आम्हाला हवं होतं. ही जाहिरात पाहून तुम्ही नक्कीच नॉस्टॅलजिक व्हाल. वाचाः सिम्फनीच्या टीमसोबत काम करणे आणि या आकर्षक मोहिमेचा भाग होणे फार आनंदादायी होते. या जाहिरातीतून सिम्फनीची 'रीफ्रेशिंग लाइव्ज' ही ब्रँड ओळख प्रस्थापित होते आणि त्यात उत्साह, ऊर्जा असा आणखी एक वेगळा आयाम मिळतो. वापराचे अनेक प्रकार आणि लोकांच्या मुडवर कुलिंगचा होणारा परिणाम हे सुद्धा यात दाखवण्यात आले आहे. सभोवतालचे वातावरण गार आणि आल्हाददायक झाले की काय बदल होतात हे माइकी यांची उत्तम संगीतरचना आणि उत्साह नृत्याचा वापर करून दाखवण्यात आले आहे. वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OhnmEE

Comments

clue frame