नवी दिल्लीः पोकोने भारतात आपला Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. नवीन फोन लाँच होताच कंपनीने जुना फोन पोको एक्स ३ स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर ही तुमच्यासाठी जबरदस्त संधी आहे. पोको एक्स ३ मध्ये स्नॅपड्रॅगन 732G प्रोसेसर आणि ६.६७ इंच यासारखे खास वैशिष्ट्ये दिली आहेत. वाचाः पोको एक्स ३ प्रो स्मार्टफोनच्या ऑनलाइन इव्हेंट मध्ये कंपनीने पोको एक्स ३ च्या किंमतीत कपात करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. पोको एक्स ३ स्मार्टफोनला आता २ हजार रुपये कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. कंपनीच्या माहितीनुसार, पोको एक्स ३ची सुरुवातीची किंमत १४ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. नवीन किंमत १ एप्रिल २०२१ पासून लागू होणार आहेत. कंपनीचा दावा आहे की, नवीन किंमतीसोबत पोको एक्स ३ मार्केटमधील २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीसोबत येणारा सर्वात पॉवरफुल फोन्स पैकी एक फोन आहे. वाचाः POCO X3 चे फीचर्स पोको एक्स ३ मध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस दिला आहे. याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३२जी प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. फोनमध्ये ग्राफिक्ससाठी अड्रेनो 620 GPU दिला आहे. स्मार्टफोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. पोको एक्स ३ मध्ये सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी स्क्रीनवर पंचहोल कटआउट मध्ये एक २० मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. पोको एक्स ३ मध्ये 6000mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. फोन अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड MIUI 11 वर काम करतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QNweCB
Comments
Post a Comment