Poco F3 आणि Poco X3 Pro स्मार्टफोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्लीः Launch: हँडेसट निर्माता कंपनी पोकोने आपले लेटेस्ट स्मार्टफोन पोको एक्स ३ प्रो आणि पोको एफ३ ला ग्राहकांसाठी लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे प्रो स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप सोबत स्नॅपड्रॅगन ८६० जी प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तर दुसरीकडे Poco F3 स्मार्टफोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्कींग साठी स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. वाचाः दोन्ही स्मार्टफोनची किंमत पोको X3 प्रो च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज ची किंमत 199 यूरो (जवळपास १७ हजार रुपये) आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज ची किंमत 249 यूरो (जवळपास २१ हजार ५०० रुपये) आहे. तर पोको F3 च्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज ची किंमत 299 यूरो (जवळपास २५ हजार ७०० रुपये) आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेजची किंमत 349 यूरो (जवळपास ३० हजार रुपये) आहे. या फोनची भारतीय किंमत किती असणार या संबंधी कुठलीही माहिती समोर आली नाही. पोको X3 प्रो चे फीचर्स स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा एलसीडी फुल एचडी प्लस रिझॉल्यूशनचा सिंगल पंच होल डिस्प्ले दिला आहे. डिस्प्ले च्या रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात 7nm स्नॅपड्रॅगन 855+ ऑक्टा-कोर प्रोसेसेर सोबत एड्रेनो 640 GPU दिला आहे. फोनमध्ये 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेज ऑप्शन दिले आहे. वाचाः फोनच्या रियरम मध्ये पॅनल मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे. सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड स्नॅपड्रॅगन दिला आहे. ज्यात एक मायक्रो आमि दुसरा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा लेन्स दिला आहे. पोको X3 प्रो मध्ये 5,160mAhची बॅटरी दिली आहे. कंपनीने यात लिक्विड कूल टेक्नोलॉजी दिली आहे. १.० प्लसचा वापर केला आहे. यात गेमिंग दरम्यान फोन गरम होत नाही. या फोनमध्ये ३३ वॉटी फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. स्मार्टफोनमध्ये कंपनीने MIUI 12 इंटरफेस दिले आहे. जे अँड्रॉयड ११ वर बेस्ड आहे. या फोनला तीन कलरमध्ये फँटम ब्लँक, फ्रोस्ट ब्लू आणि मेटल ब्रॉन्ज मध्ये लाँच केले आहे. या फोनची विक्री २४ मार्च ते १ एप्रिल दरम्यान सुरू राहणार आहे. वाचाः पोको F3 चे फीचर्स स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा अमोलोड फुल एचडी प्लस रिजॉल्यूशनचे सिंगल पंच होल डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz दिला आहे. यात 7nm स्नॅपड्र्रॅगन 870 ऑक्टा-कोर प्रोसेसेर दिला आहे. फोन मध्ये 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजचे ऑप्शन मिळणार आहे. फोनमध्ये रियर पॅनेलवर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स दिला आहे. तर ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स दिला आहे. दोन अन्य लेन्सची माहिती दिली नाही. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पोको X3 प्रो मध्ये 4,520mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cSRdeM

Comments

clue frame