Moto G100 चे खास फीचर्स लीक, नव्या फोटोवरून डिझाइनची माहिती उघड

नवी दिल्लीः मोटोरोला २५ मार्च रोजी आयोजित होणाऱ्या एका ग्लोबल लाँच इव्हेंटमध्ये नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोनची घोषणा करणार आहे. आता लाँच आधीच प्रसिद्ध टिप्स्टर इवान ब्लास ने मोटो जी १०० च्या फीचर्स संबंधी आणखी एक हाय रिझॉल्यूशन फोटो लाँच केला आहे. वाचाः ब्लू कलरच्या मोटी जी १०० मध्ये एक ड्यूल पंच होल स्क्रीन पाहिले जाऊ शकते. फोनच्या ग्रेडियंट रियर पॅनेलवर एक स्क्वायर शेप क्वॉड कॅमेरा सेटअप आणि मोटोरोला बेटविंग लोगो दिसत आहे. फोनमध्ये उजव्या बाजुला गुगल असिस्टेंट बटन तर डाव्या बाजुला व्हॅल्यूम रॉकर आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिले आहे. वाचाः मोटो जी १००च्या वरच्या भागात किनार रिकामी ठेवली आहे. खालच्या बाजुला ३.५ एमएम ऑडियो जॅक, यूएसबी टाईप सी पोर्ट, मायक्रोफोन आणि स्पीकर ग्रिल दिले आहे. कंपनीने कलरला आयरिडिसेन्ट ओशन नाव दिले आहे. याआधी एक लीक मध्ये दावा करण्यात आला होता की, हा फोन सिल्वर कलर मध्ये उपलब्ध केला जाणार आहे. मोटो जी १०० ची संभावित फीचर्स मोटोजी १०० मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी रिझॉल्यूशन स्क्रिन दिली आहे. फोनमध्ये ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला जाऊ शकतो. हँडसेटमध्ये रियरवर ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १६ मेगापिक्सलचा, २ मेगापिक्सलचा आणि एक टेलिफोटो सेन्सरचा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. वाचाः मोटोजी १०० मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते. इवान ब्लासने दावा केला आहे की, फोनला एक मॉनिटर सोबत कनेक्ट करू शकतो. या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज सोबत व्हेरियंटची किंमत युरोपमध्ये ४७९.७७ युरो असणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f0ZTCz

Comments

clue frame