नवी दिल्लीः ओप्पो (Oppo)च्या एका सीरीजल जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. ओप्पोची सीरीज आहे. ओपो इंडियाने सांगितले की, Oppo F19 Pro सीरीज ने मार्केट मध्ये उपलब्ध केल्यानंतर केवळ ३ दिवसांत २३० कोटी रुपयांचे स्मार्टफोनची विक्री केली आहे. सेलच्या पहिल्या दिवशी या स्मार्टफोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या ३ दिवसांत या फोनने जबरदस्त कमाल केली आहे. Oppo F19 Pro सीरीज मध्ये कंपनीने F19 Pro आणि F19 Pro+ स्मार्टफोन आणले आहेत. वाचाः कंपनीच्या म्हणण्यानुसार, AI हायलाइट पोर्ट्रेट विडियो, स्मार्ट 5G, ड्यूल-विडियो मोड, सुपीरियर बॅटरी, इमर्सिव गेमिंग एक्सपीरियंस सारखे अनेक यूनीक फीचर्स च्या जोरावर F19 Pro सीरीजला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. Oppo F19 Pro+ 5G आणि F19 Pro या दोन्ही स्मार्टफोन्सचे ऑनलाइन आणि ऑफलाइन चॅनेल्सवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. याआधी Oppo F19 Pro सीरीज ने F सीरीज मध्ये स्मार्टफोन्समधील आधीच्या एफ सीरीजला मागे टाकले आहे. ओप्पो F19 Pro सीरीजच्या दोन्ही वेरियंट्स मध्ये F19 Pro+ 5G ला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. वाचाः Oppo F19 Pro+ 5G स्मार्टफोनची किंमत २५ हजार ९९० रुपये आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा व्हेरियंटची किंमत आहे. Oppo F19 Pro ची सुरुवातीची किंमत २१ हजार ४९० रुपये आहे. ही किंमत ८ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजची किंमत २३ हजार ४९० रुपये आहे. ओप्पोच्या दोन्ही नवीन स्मार्टफोनमध्ये फ्लूड ब्लॅक आणि स्पेस सिल्वर ऑप्शन ऑप्शंस दिले आहे. वाचाः Oppo F19 Pro+ स्मार्टफोन मध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. डि्सप्ले 60Hz रिफ्रेश रेट सोबत येते. डिस्प्ले, कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे आणि स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.8 आहे. स्मार्टफोन मध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये रियर क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Oppo F19 Pro+ स्मार्टफोनमध्ये 4,310 mAh ची बॅटरी दिली आहे. Oppo F19 Pro स्मार्टफोनमध्ये ६.४३ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिले आहे. स्मार्टफोनमध्ये रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. म्हणजेच मागे ४ कॅमेरे दिले आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा दिला आहे. 4,310 mAhची बॅटरी दिली आहे. 30W VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dbZRVI
Comments
Post a Comment