फोनला वारंवार चार्ज करून त्रस्त झालात?, हे अॅप्स वाढवतील बॅटरी लाइफ

नवी दिल्लीः सध्या कंपन्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6000mAh आणि 7000mAh क्षमतेची बॅटरी देत आहे. परंतु, अजूनही अनेक स्मार्टफोन कंपन्या आपल्या स्मार्टफोनमध्ये 4000mAh किंवा 5000mAh क्षमतेची बॅटरी देत आहेत. त्यामुळे फोन जुना होत असताना बॅटरी लाइफ त्याची कमी कमी होत जाते. अनेकदा फोनची बॅटरी दिवसभर सुद्धा जात नाही. युजर्सं कमी ब्राइटनेस, जीपीएस आणि डेटा बंद करून बॅटरी वाचवण्याचे प्रयत्न करीत असतात. काही अॅप्स आहेत जे तुमच्या फोनची बॅटरीची समस्या बऱ्याच प्रमाणात कमी करू शकते. वाचाः 1. Naptime नेपटाइम नावाचे अॅपला Francisco Franco डेवलपर ने तयार केले आहे. दुसऱ्या बॅटरी सेवर अॅप्सप्रमाणे फोनची मेमरीला क्लिन करत नाही. या अॅपचे काम आहे की, फोन ज्यावेळी वापरला जात आहे त्यावेळी याची बॅटरी जास्त खर्च न होऊ देणे. म्हणजेच फोनची स्क्रीन बंद झाल्याने ४ ते ५ मिनिट नंतर हे अॅक्टिवेट होते. तसेच बॅटरी वाचवण्याचे काम करते. 2. Greenify या अॅपला डेव्हलपर Oasis Feng ने तयार केले आहे. हे अॅप ज्यावेळी खूप कामाचे आहे. ज्यावेळी तुमच्याकडे चार्जिंगची कोणतीही व्यवस्था नाही आहे. नेपटाइम प्रमाणे हे अॅप सुद्धा फोनच्या आत उर्वरित अॅप्सना झोपी घालते. म्हणजेच ज्यावेळी फोनचा वापर होत नाही. त्यावेळी बॅटरी वाचवण्याचे काम हे अॅप करते. 3. Battery Guru बॅटरी गुरू अॅपला Paget96 ने डेव्हलप केले आहे. हे बॅटरी सेविंग अॅप असल्याने बॅटरी मॉनिटरिंग अॅप आहे. या अॅपवरून कळते की, कोणता अॅप सर्वात जास्त बॅटरी खर्च करीत आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात तुम्ही बॅटरी टेंपरेचर आणि चार्जिंग लिमिटचे रिमाइंडर सेट करू शकता. 4. Servicely या अॅपच्या डेव्हलपरचे नाव Francisco Franco आहे. ज्यावेळी फोनचा वापर होतो. त्यावेळी अन्य अॅपसाठी बॅटरी खर्च न होऊ देणे, हे या अॅपचे काम आहे. यात एखाद्या वेळी तुम्ही आवश्यक नोटिफिकेशन मिस करू शकतात. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन हवे की बॅटरी वाचवायची हे तुम्ही ठरवा. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3r4rpRP

Comments

clue frame