चार्जरशिवाय आयफोन देणे महागात; अॅपलला १४ कोटींचा दंड

ब्राझिलीया: चार्जरशिवाय आयफोनची विक्री करणे अॅपल कंपनीला महागात पडलं आहे. ब्राझीलमधील ग्राहक संरक्षण संस्थेने ( प्रोकॉन- एसपीनं) अॅपलला १४ कोटींचा दंड ठोठावला आहे. अॅपल कंपनीने आयफोन-१२ सह चार्जर न दिल्यानं कंपनीला हा दंड सुनावण्यात आला आहे. अॅपलनं हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असं म्हटलं. चार्जरमुळे निर्माण होणार ई-कचरा कमी करण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी म्हटलं. पण त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही, असं प्रोकॉन- एसपीनं म्हटलं. अॅपलने मोबाइल हँडसेटसह चार्जर दिला नाही. तरीदेखील फोनची किंमत कमी का केली नाही, असा प्रश्नही प्रोकॉन- एसपीनं उपस्थित केला. अॅपलने चार्जरशिवाय आणि चार्जरसह मोबाइलची किंमत किती असेल याची माहिती दिली नाही. वाचा: यामुळे अॅपलला ठोठावला दंड 'दिशाभूल करणारा प्रचार, चुकीच्या परिस्थितीत आणि चार्जरशिवाय डिव्हाइसची विक्री' केल्याचा आरोप अॅीपलवर करण्यात आला आहे. त्यामुळेच कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. बॉक्समध्ये वापरकर्त्यांना चार्जर न दिल्यानं वातावरणाचा कसा आणि किती फायदा झाला असा प्रश्न प्रोकॉन-एसपीने विचारला. मात्र, अॅपलने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. कमी झालेल्या चार्जर उत्पादनाचा फायदा कंपनीला झाला की नाही? हे एजन्सीला जाणून घ्यायचे होते. वास्तविक, बॉक्समधून चार्जर काढण्याऐवजी त्यांची किंमत कमी केली जावी, असं देखील एजन्सीनं म्हटलं. युजर्सनी आयओएस अपडेट केले त्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अॅपलनं या अडचणीबाबतही युजर्सची कोणतीही मदत केली नाही,असेही प्रोकॉन- एसपीनं म्हटले. वाचा: ब्राझीलमध्ये कठोर नियम ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणाविषयी कठोर नियम आहेत. प्रोकॉन- एसपीचे कार्यकारी संचालक फर्नांडो कॅपेज म्हणाले की, ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणविषयक कठोर नियम आहेत. अशा परिस्थितीत कंपनीला त्यांचा आदर करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले. वाचा: अॅपलला फायदा अॅपलनं गेल्या वर्षी '' लाँच केला होता. नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही. तसंच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नसल्याचे कंपनीने म्हटले होते. ई-वेस्टच्या (इलेक्ट्रॉनिक कचरा) त्रासापासून पर्यावरणाला वाचवायचे आहे यासाठी असा निर्णय घेतला असल्याचे कंपनीने म्हटले होते. अॅपलच्या या निर्णयाचे अनुकरण सॅमसंग कंपनीदेखील करणार आहे. मात्र, अॅपलने घेतलेल्या या निर्णयामुळे कंपनीचा फायदा झाला असल्याचे जाणकार सांगतात. कंपनीचा शिपिंग खर्चही कमी झाला. त्याशिवाय मॅगसेफ चार्जर मागील वर्षीच कंपनीने लाँच केला होता. हँडसेट चार्जरशिवाय देण्याच्या निर्णयामुळे या चार्जरच्या विक्रीतही वाढ झाली असल्याचे जाणकार सांगतात.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OSm3w5

Comments

clue frame