वोडाफोन आयडियाचा रिचार्ज महागले, आता मोजावी लागणार इतकी रक्कम

नवी दिल्लीः देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी वोडाफोन आयडिया (Vodafone Idea) ने आपले फॅमिली पोस्टपेड प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी बातमी येत होती की, मोबाइल प्लान महाग होणार आहेत. आता हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वाचाः Vodafone Idea ने सर्वात कमी किंमतीच्या दोन फॅमिली पोस्टपेड प्लानची किंमत ५९८ रुपये आणि ६९९ रुपये आहे. या दोन्ही प्लानची किंमत आता कंपनीने वाढवली आहे. फॅमिली पोस्टपेड प्लान (Family Postpaid Plan) ला एकापेक्षा अधिक लोक वापर करू शकतात. म्हणजेच तुम्ही प्लान खरेदी केला आहे तर अन्य कुटुंबातील सदस्य याचा लाभ घेऊ शकतात. वाचाः Vodafone Idea चा ६४९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा फॅमिली पोस्टपेड प्लान जो की ६४९ रुपयांना मिळत आहे. जर डेटा बेनिफिटमध्ये यात एकूण ८० जीबी डेटा मिळतो. ज्यात ५० जीबी प्रायमरी कनेक्शन साठी आणि ३० जीबी सेकंडरी कनेक्शनसाठी दिला आहे. व्हाइस कॉलिंग साठी यात अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये १०० एसएमएस मिळते. अतिरिक्त फायद्यात या प्लानमध्ये वर्षभरासाठी अमेझॉन प्राइन आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे व्हीआयपी सब्सक्रिप्शन मिळते. या प्लानमध्ये एक प्रायमरी आणि एक अड ऑन कनेक्शन मिळते. वाचाः वोडाफोन आयडियाचा ७९९ रुपयांचा प्लान वोडाफोन आयडियाचा फॅमिली पोस्टपेड प्लान आता ७९९ रुपयांना मिळत आहे. डेटा बेनिफिटमध्ये या प्लानमध्ये १२० जीबी डेटा मिळतो. ज्यात ६० जीबी प्रायमरी कनेक्शन साठी आणि ३० जीबी सेकंडरी आणि ३० जीबी थर्ड कनेक्शनसाठी होतो. व्हाइस कॉलिंग मध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या प्लानमध्ये १०० एसएमएस दर महिन्याला मिळते. या प्लानमध्ये १ वर्षासाठी अॅमेझॉन प्राइम आणि डिज्नी प्लस हॉट्स्टार चे व्हीआयपी सब्सक्रिप्शन फ्री मिळते. या प्लानमध्ये एक प्रायमरी आणि एक एड ऑन कनेक्शन मिळते. वाचाः मिळालेल्या माहितीनुसार, वोडाफोन आयडियाच्या ५९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५१ रुपयांची वाढ झाली आहे. यानंतर याची किंमत ६४९ रुपये झाली आहे. तर ६९९ रुपयांच्या प्लानमध्ये १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याची किंमत आता ७९९ रुपये झाली आहे. या किंमतीवर सध्या कोणताही टॅक्सचा समावेश करण्यात आला नाही. वोडाफोन आयडियाचे हे दोन्ही प्लान उत्तर प्रदेश ईस्ट, चेन्नई, तामिळनाडू, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोव्यात कार्यरत आहेत. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f8c00r

Comments

clue frame