ऑनलाइन टॅक्स स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन

म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘तुम्हाला कोट्यवधींचे बक्षीस लागले असून पुढील लिंकवर क्लिक करा’, ‘तुमच्या विम्याची रक्कम खात्यात जमा झाली असून संकेतस्थळाला भेट द्या’, ‘बँक खात्याचा तपशील भरा, प्राप्तिकर होणार माफ’ असे मेसेज आणि ई-मेल येण्याचे प्रमाण वाढले असून आर्थिक आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. अशा ऑनलाइन सापळ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे. वाचाः करोना प्रादुर्भावाच्या काळात सायबर भामट्यांनी नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने अनेक युक्त्याचा वापर सुरू केला आहे. टाळेबंदीमध्ये बहुतांश लोकांच्या नोकरीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याचा फायदा घेत सायबर भामटे एक मेल पाठवतात. ज्यामध्ये ‘घरबसल्या काम करा आणि पैसे कमवा’, अशी माहिती दिलेली असते. त्यासाठी अॅमेझॉन डॉट कॉम आणि अशा बनावट लिंकचा वापर सायबर भामट्यांकडून केला जातो. त्याच्यावर क्लिक करताच बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते. त्या आधारावर आर्थिक फसवणूक होऊ लागली आहे. वाचाः एक ई-मेल किंवा मेसेज येतो, ज्यामध्ये कुठल्याही प्रकाराचा कर भरायचा बाकी असल्यास तो सोबतच्या लिंकवर क्लिक करून एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा उल्लेख असतो. सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते. मात्र, ती सायबर भामट्यांनी बनविलेली फेक लिंक असते. या लिंकवर क्लिक केल्यास बँक खात्याशी संबंधित सर्व माहिती विचारली जाते. सध्या कर भरणा करण्याचा हा महिना असल्याने अशा प्रकारची फसवणूक वाढली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cQ3pgi

Comments

clue frame