नवी दिल्लीः इंडियन कंपनी लावाने खूप दिवसांची वाट पाहिल्यानंतर तसेच लीक्स नंतर भारतीय बाजारात आपली तीन टेबलेट्स लाँच केले आहे. ज्यात , Aura आणि Ivory यांचा समावेश आहे. लावाच्या या टेबलेटला खास विद्यार्थ्यांसाठी लाँच केले आहे. कंपनीने याला लावा ई एज्युकेशन सीरीज अंतर्गत लाँच केले आहे. लावाच्या या टेबलेटची सुरुवातीची किंमत ७ हजार ३९९ रुपये आहे. सर्व टॅबमध्ये Wi-Fi+4Gचा सपोर्ट दिला आहे. तसेच याला विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आले आहे. वाचाः Lava Magnum XL ची फीचर्स Lava Magnum XL मध्ये १०.१ इंचाचा मोठी आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, 6100mAh ची बॅटरी दिली आहे. डिस्प्लेचे ब्राइटनेस ३९० निट्स आहे. या टेबमध्ये फ्रंट कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. यात ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. मेमरी कार्डच्या मदतीने याला २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या टेबमध्ये २ जीबी रॅम आहे. या टेबमध्ये मीडियाटेक चे 2GHz चे क्वॉडकोर प्रोसेसर दिले आहे. Lava Magnum XL ला डार्क ग्रे शेड मध्ये मॅटालिक फिनिश सोबत खरेदी करू शकता. या टेबची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर हे ११ हजार ९९९ रुपयात मिळत आहे. वाचाः चे फीचर्स या टॅबमध्ये ८ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. ज्यात 5100mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. या टॅबमध्ये ३२ जीबीचे स्टोरेज दिले आहे. ज्याला २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. यात २ जीबी रॅम दिली आहे. यात ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या टॅबमध्ये फिनिशिंग सुद्धा मॅटेलिक आहे. यात मीडियाटेकचे 2GHz चे क्वॉडकोर प्रोसेसर दिले आहे. याची किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, हे टॅब ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. चे फीचर्स या टॅबमध्ये ७ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याच्या बॅक पॅनेलवर टेक्चर हेयरब्रश फिनिश दिले आहे. य़ाशिवाय, यात १६ जीबीचे स्टोरेज दिले आहे. ज्याला २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. यात २ जीबी रॅम दिला आहे. यात ५ मेगापिक्सलचा रियर आणि २ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. याची किंमती ९ हजार ४९९ रुयपे आहे. परंतु, फ्लिपकार्टवर याची किमत ७ हजार ३९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eWoM2b
Comments
Post a Comment