व्यापाऱ्यांचा आता अॅपमार्ग; ई-कॉमर्स कंपन्यांविरुद्ध ‘भारत ई-मार्केट’

म. टा. प्रतिनिधी, मुंबई ई-कॉमर्स कंपन्यांचा पारंपरिक व्यवसायाला फटका बसला आहे. त्याचा सामना करण्यासाठी आता व्यापाऱ्यांनी स्वत:चेच खरेदी-विक्री अॅप तयार केले आहे. ‘’ नावाच्या या अॅपला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) हे अॅप तयार केले आहे. वाचाः अखिल भारतीय व्यापारी महासंघ ही देशभरातील व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. देशभरातील पारंपरिक व्यापाऱ्यांना ई-कॉमर्स कंपन्यांशी सामना करता यावा, यासाठी त्यांनीच पुढाकार घेत हे अॅप तयार केले आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत ३० हजारहून अधिक व्यापाऱ्यांची नोंदणी झाली आहे, तर ७५ हजारहून अधिक ग्राहकांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. मुंबईतदेखील या अॅपला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. वाचाः याबाबत ‘कॅट’चे मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी सांगितले की, ‘मुंबईतही या अॅपबाबत व्यापारी चांगलेच उत्साही आहेत. आतापर्यंत चार हजारहून अधिक व्यापाऱ्यांनी या अॅपला प्रतिसाद दिला आहे. तेवढे व्यापारी त्यांची उत्पादने विक्री करण्यासाठी ऑनलाइन मंचावर आले आहेत. त्यामध्ये विविध क्षेत्रातील व्यापाऱ्यांचा समावेश आहे.’ किरकोळ व्यापारीही लवकरच मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास साडे तीन लाख व्यापारी ‘कॅट’शी संलग्न आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने घाऊक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. यानुसार मुंबईत पहिल्या टप्प्यात घाऊक क्षेत्रातील व्यापारी या ‘अॅप’शी जोडले जात आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील किरकोळ व्यापारीदेखील या मंचावर येतील, असे ‘कॅट’ने स्पष्ट केले. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QiHKpx

Comments

clue frame