टेक्‍नोकडून दोन इअरफोन्‍ससह चार नवीन उत्‍पादने लाँच

नवी दिल्‍ली: या जागतिक प्रिमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज त्‍यांचा उत्‍पादन पोर्टफोलिओ वाढवण्‍याच्‍या, तसेच त्‍यांची कनेक्‍टेड डिवाईस इकोयंत्रणा दृढ करण्‍याच्‍या उद्देशाने स्‍मार्टफोन अॅक्‍सेसरीजची सीरीज लाँच करण्‍याची घोषणा केली. ब्रॅण्‍ड नवीन टीडब्‍ल्‍यूएस बड्स १, हॉट बीट्स १२ व प्राइम पी१ इअरफोनसह मायक्रो यूएसबी केबल एम११ लाँच केली आहे. वाचाः टेक्‍नो इअरबड्स १ (टीडब्‍ल्‍यूएस) मनोरंजनासाठी उत्तम सुविधेचा विचार करता तेव्‍हा टेक्‍नो इअरबड्स १ त्‍याची पूर्तता करतात. या वायरलेस बड्स १ मध्‍ये ४० एमएएच* २ बॅटरी आहे, ज्‍यामधून एका चार्जमध्‍ये ४ तासांच्या म्‍युझिक प्‍लेबॅक टाइमची खात्री मिळते. तसेच ३०० एमएएच चार्जिंग केस १२ तासांहून अधिक वेळेपर्यंत विनाव्‍यत्‍यय संगीत ऐकण्‍याचा अनुभव देते. या वायरलेस इअरबड्समध्‍ये सिंगल व डबल असे दोन मोड्स आहेत, ज्‍यामधून मुख्‍यत्‍वे ड्रायव्हिंगच्‍या वेळी बॅकग्राऊण्‍ड आवाज ऐकू येण्‍यासाठी जोडीमध्‍ये उत्तमप्रकारे बदल करण्‍याची खात्री मिळते. या वैशिष्‍ट्यासह व्‍यक्‍ती कोणतेतरी एक इअरबड्स बंद करून कॉल्‍स घेऊ शकते आणि बाहेरील वाहतूकीदरम्‍यान दुस-या कानाने दक्ष राहू शकते. टेक्‍नो इअरबड्स १ ची किंमत १,२९९ रूपये आहे. वाचाः हॉट बीट्स १२ हॉट बीट्स १२ इअरफोन्‍समध्‍ये सुस्‍पष्‍ट आवाजासाठी ड्युअल साऊंड ड्रायव्‍हर आहे. तसेच यामध्‍ये इन-लाइन कंट्रोल युनिटसह फंक्‍शन्‍स जसे प्‍ले, पॉज, व्‍हॉल्‍युम समायोजित करणे, कॉल्‍स स्‍वीकारणे किंवा नाकारणे आणि इन-बिल्‍ट मायक्रोफोन आहे. बास आवाज असलेले क्‍वॉड स्‍पीकर्स बाहेरील आवाज ऐकू न येण्‍याची खात्री देतात. हॉट बीट्स १२ इअरफोन्‍स टीपीई थ्रेड वायर १.२ एमसह सुरक्षित आहेत. हॉट बीट्स १२ ची किंमत ३४९ रूपये आहे. वाचाः प्राइम पी१ टेक्‍नो प्राइम पी१ मध्‍ये सडपातळ व आकर्षक मेटॅलिक डिझाइन व सुरक्षित टीपीई वायर आहे. तसेच यामध्‍ये हँड्स-फ्री कॉलिंगसाठी मायक्रोफोन आणि सुलभपणे प्‍ले, पॉज व व्‍हॉल्‍युम समायोजित करण्‍यासाठी मल्‍टी-फंक्‍शन बटन रिमोट आहे. प्राइम पी१ इअरफोन्‍समध्‍ये सुस्‍पष्‍ट ऑडिओ क्‍वॉलिटीसाठी विशाल मेगा बास आहे. वजनाने अत्‍यंत हलका व आरामदायी प्राइम पी१ ची किंमत २२५ रूपये आहे. वाचाः केबल एम११ अत्‍यंत लांब, २ अॅम्पियर फास्‍ट चार्जिंग, मायक्रो यूएसबी असलेली केबल एम११ ५.० व्‍हॉल्‍ट/२.१ अॅम्पियरच्‍या आऊटपुटसह हाय स्‍पीड डेटा ट्रान्‍सफर देते. १ मीटर लांब असलेली केबल नुकसान किंवा मोडतोडीपासून संरक्षणासाठी उच्‍च दर्जाच्‍या टिकाऊ पीव्‍हीसीसह डिझाइन करण्‍यात आली आहे. केबल एम११ ची किंमत १२५ रूपये आहे. वाचाः


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31cYz7l

Comments

clue frame