नवी दिल्लीः मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ पर्यंत वाढविली म्हणून ३० जूनची वाट पाहत बसू नका. आतापासूनच तुम्ही ऑफलाइन पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची तयारी कार. यासाठी पॅन सेवा प्रदाता, NSDL या UTIITSL च्या सर्विस सेंटरवर जाऊन पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकते. त्यासाठी ‘Annexure-I’ फॉर्म भरावा लागेल आणि पॅन कार्ड आणि आधार कार्डची प्रत सोबत घ्यावी लागेल. ही प्रक्रिया विनामूल्य नाही. यासाठी तुम्हाला निश्चित फी भरावी लागेल. लिंक करताना पॅन किंवा आधार तपशिलात सुधारणा करण्यात आली की नाही यावर ही फी अवलंबून असेल. वाचाः पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आज ३१ मार्च शेवटची तारीख होती, पण ती तारीख आता वाढवण्यात आली आहे. मोदी सरकारने पॅनशी आधार क्रमांक जोडण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ पर्यंत वाढविली. आयकर अधिनियम १९६१ च्या कलम १४८ अन्वये नोटीस बजावण्याची तारीख, विवाद निवारण पॅनेलने (DRP) जारी केलेल्या निर्देशासाठी निकालाचा आदेश मंजूर करणे आणि समानता आकारणी निवेदनांवर प्रक्रिया करण्यासाठीही ३० एप्रिल २९२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वाचाः आयकर विभागाची वेबसाईट क्रॅश झाल्यामुळे लोक फार त्रस्त झाले आहेत. याबद्दल सोशल मीडियावर ते पोस्ट करत होते. सर्वात आधी बुधवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास आयकर विभागाची साईट क्रॅश झाली, त्यानंतर ती पूर्ववत केली गेली. परंतु त्यानंतरही वेबसाईट वारंवार क्रॅश होत होती. त्यामुळे लोक सोशल मीडियावर आयकर विभागाकडे ३१ मार्च रोजी होणारी अंतिम मुदत वाढविण्याची मागणी करत होते, त्यानुसारच ही मुदतवाढ देण्यात आली. ३१ मार्च २०२१ ऐवजी आता ३० जून २०२१ पर्यंत नागरिकांना कोणत्याही शुल्काशिवाय किंवा दंडाशिवाय आधार क्रमांक पॅन क्रमांकाला जोडता येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dkIRgh
Comments
Post a Comment