१५४ रुपये कमी देऊन ५६ दिवसांची वैधता, रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग मिळवा

नवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी २ जीबी डेटाचे अनेक प्लान ऑफर केले आहेत. वेगवेगळ्य किंमतीचे वेगवेगळे प्लान मध्ये २८ दिवसांपासून ते ३६५ दिवसांपर्यंतची वैधता मिळते. त्यामुळे अशा प्लानमध्ये निवड करणे कठीण होऊन बसते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओचा असा एक प्लान सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला १५४ रुपये किंमतीत येतय यात ५६ दिवसांची वैधता मिळते, रोज २ जीबी डेटा मिळतो. वाचाः जिओच्या सर्व प्लानमध्ये आता एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. त्यामुळे तुम्हाला प्लानची निवड करायची असल्यास डेटा आणि त्यात मिळणारी वैधता पाहून निवड करावी लागणार आहे. जर तुम्हाला जिओचा रोज २ जीबी डेटा (jio 2gb per day plan) हवा असेल तर तसेच तुमची नजर ४४४ रुपये आणि ५९८ रुपयांच्या प्लान वर बरोबर गेली असेल. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी या दोन्ही प्लानची तुलना करुन सांगणार आहोत की, कोणता प्लान बेस्ट आहे. वाचाः जिओचा ४४४ रुपयांचा प्लान रिलान्यस जिओचा ४४४ रुपयांचा प्लान मध्ये रोज २ जीबी डेटा सोबत येतो. हा ५६ दिवसांच्या वैधते सोबत येतो. ज्यात यूजर्संना एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. डेटा सोबत सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. प्लानमध्ये JioTv आणि JioCinema सारख्या जिओ अप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जातात. याशिवाय, अन्य बेनिफिट मिळतात. वाचाः जिओचा ५९८ रुपयांचा प्लान जिओचा ५९८ रुपयाचा प्लानमध्ये युजर्संना रोज २ जीब डेटा आणि ५६ दिवसांची वैधता मिळते. जिओच्या या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन दिले जाते. कोणत्या प्लानमध्ये किती फायदा रिलायन्स जिओचा ५९८ रुपये आणि ४४४ रुपयांच्या प्लानमध्ये एक सारखी (५६ दिवस) वैधता मिळते. तसचे डेटा (११२ जीबी) मिळतो. यातील सर्वात मोठा फरक म्हणजे Disney+ Hotstar चे सब्सक्रिप्शन मधील आहे. जे ५९८ रुपयांत दिले आहे. तर ४४४ रुपयांच्या प्लानमध्ये दिले नाही. ही मेंबरशीप हवी नसल्यास १५४ रुपये वाचवता येऊ शकतात. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sdUGLe

Comments

clue frame