Apple Days Sale सुरू, ६ दिवस स्वस्तात खरेदी करा आयफोन मॉडल्स, मोठी बचत करा

नवी दिल्लीः जर तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर सध्या अॅपल डेज सेल सुरू करण्यात आला आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर २१ मार्च पासून अॅपल डेज सेलला सुरुवात झाली आहे. ६ दिवस चालणाऱ्या अॅपल डेज सेलमध्ये आयफोनचे अनेक स्मार्टफोन मॉडल्सवर डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची जबरदस्त संधी आहे. कोणकोणत्या आयफोन मॉडलवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. जाणून घ्या. वाचाः या सेलमध्ये आयफोन ११ च्या ६४ जीबी स्टोरेजच्या फोनवर १४ टक्के सूट दिली जात आहे. या सूटनंतर ४६ हजार ९९९ रुपये (एमआरपी ५४ हजार ९०० रुपये) किंमतीत विकला जात आहे. याचाच अर्थ हा फोन एमआरपी पेक्षा ७ हजार ९०१ रुपये स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. फोनमध्ये 12MP+12MP डुअल रियर कॅमेरा सेटअप, 6.1 इंच लिक्विड रेटिना एचडी डिस्प्ले आणि A13 बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे. वाचाः iPhone XR आयफोन एक्स आर च्या ६४ जीबी स्टोरेजला १८ टक्के सूट नंतर ३८ हजार ९९९ रुपये (एमआरपी ४७ हाजर ९०० रुपये) मध्ये खरेदी करता येऊ शकते. याचाच अर्थ फोन एमआरपीपेक्षा ८ हजार ९०१ रुपये स्वस्त किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. फोनमध्ये 12MP चे रियर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ७ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. आयफोन एसई ला खरेदी करायचे असेल तर या फोनच्या ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंटला २४ टक्के सूट नंतर २९ हजार ९९९ रुपये (एमआरपी ३९ हाजर ९०० रुपये खरेदी करू शकता. या फोनमध्ये ४.७ इंच डिस्प्ले शिवाय, ए १३ बायोनिक चिपसेटचा वापर केला आहे. वाचाः iPhone 12 आयफोन १२ मिनी खरेदी करायचा असेल तर या फोनवर पूर्ण ६ हजार रुपयांची बचत करता येऊ शकते. परंतु, खरेदीदारांना एचडीएफसी बँक कार्ड किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शनद्वारे पेमेंट करावे लागेल. कार्ड डिस्काउंट नंतर ६४ जीबी व्हेरियंट ५७ हजार ९०० रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. iPhone 12 Pro या अॅपल डेज सेल मध्ये या फोनमध्ये ५ हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. परंतु, सूटचा फायदा केवळ एचडीएफसी बँक कार्ड किंवा ईएमआय ट्रान्झॅक्शन द्वारे पेमेंट केल्यानंतर ग्राहकांना मिळू शकणार आहे. कार्ड डिस्काउंट नंतर या फोनच्या १२८ जीबी व्हेरियंट १ लाख १४ हजार ९०० रुपयात मिळू शकणार आहे. वाचाः Apple iPhone 12 Max या आयफोन मॉडलवर ५ हजार रुपयांचे डिस्काउंट एचडीएफसी कार्ड सोबत मिळत आहे. या प्रीमियम फोनच्या १२८ जीबी स्टोरेजची किंमत १ लाख २४ हजार ९०० रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/395hyVN

Comments

clue frame