Airtel युजर्संना जोरदार झटका, १०० रुपये किंमतीखालील प्लान बंद

नवी दिल्लीः टेलिकॉम सेक्टरची दिग्गज कंपनी भारती एअरटेलने आपला ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान बंद केला आहे. हा प्लान काही निवडक सर्कलमध्ये उपलब्ध होता. एअरटेलच्या या ९९ रुपयांचा प्रीपेड प्लान मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, राजस्थान, आणि उत्तर प्रदेश ईस्ट सारख्या काही निवडक सर्कलमध्ये हा प्लान उपलब्ध होता. १९ रुपयांच्या अनलिमिटेड प्लानला सोडून आता कंपनीचा एन्ट्री लेवल अनलिमिटेड प्लान १२९ रुपयांपासून सुरू आहे. आधी ९९ रुपये होता. वाचाः ९९ रुपयांत मिळत होते हे फायदे एअरटेलच्या ९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानमध्ये १८ दिवसांची वैधता मिळत होती. यात एकूण १ जीबी डेटा आणि प्रति दिन १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर लोकल तसेच नॅशनल कॉलिंगची सुविधा मिळत होती. या प्लानमध्ये युजर्संना Airtel Xstream, Wynk Music आणि Zee5 Premium ची फ्री सर्विस मिळत होती. वाचाः एअरटेलने २०२० च्या सुरुवातीत १२९ रुपये आणि १९९ रुपयांचे प्रीपेड प्लान आणले होते. हे प्लान दिल्ली एनसीआर, आसाम, बिहार, आणि झारखंड, मुंबई, नॉर्थ ईस्ट आणि ओडिशा पर्यंत पोहोचवण्याआधी गुजरात हरियाणा, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा आणि यूपी वेस्ट तसेच झारखंड मध्ये सुरू करण्यात आले होते. दोन्ही प्लान नंतर संपूर्ण देशात उपलब्ध करण्यात आले होते. १२९ रुपयांचे प्लानचे फायदे एअरटेलचा १२९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज मध्ये २४ दिवसांची वैधता मिळत होती. या प्लानमध्ये १ जीबी डेटा प्रति रोज, ३०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत होती. युजर्संना आता Airtel Xstream, Wynk Music आणि Zee5 Premium ची फ्री सर्विस उपलब्ध होती. वाचाः १९९ रुपयांत ही सुविधा मिळते एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना रोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज १०० मेसेज मिळते. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. तसेच युजर्संना Hello Tunes, Wynk Music, Airtel Xstream App आणि ZEE5 चे फ्री सब्सक्रिप्शन मिळत होते. वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31yFqNp

Comments

clue frame