नवी दिल्लीः Below 6000 Rupees In India: भारतातील अनेक शहरात आता प्रचंड उन्हाचे चटके बसू लागली आहेत. नागपूर सारख्या शहरात तर तापमान ४० डिग्री अंशावर गेले आहे. त्यामुळे घरात बसणे अशक्य झाले आहे. रात्री झोपताना सुद्धा असह्य होत आहे. त्यामुळे गरीबाची एसी समजले जाणारे एअर कूलर्सची मागणी उन्हाळ्यात दरवर्षी वाढते. तुम्हाला सुद्धा एअर कूलर्स घ्यायची असतील तर बजाज कंपनीचे ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीच एअर कूलर्सची माहिती या ठिकाणी देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Bajaj Platini PX97 Torque 36-Litres Cooler प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी बजाजचे ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत चांगली एयर कूलर्स आहेत. कंपनीचे हे एअर कूलर्स केवळ ५ हजार ८९९ रुपये आहे. पांढऱ्या रंगात असलेले हे एयर कूलर दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. प्लास्टिकची बॉडी असलेले या कूलरची क्षमता ३६ लीटरची आहे. स्पीड कंट्रोल, एयर डिफ्लेक्शन, कूलिंग पॅड आणि रिमूव्हेबल पॅड्स सह अन्य फीचर्स असलेल्या या कूलर्सची ऑनलाइन साइट्सवर बंपर विक्री होत आहे. या कूलरचे वजन ११.२ किलोग्रॅम आहे. वाचाः Bajaj PCF 25DLX 24 लीटर Personal Air Cooler बजाजच्या या कूलरची किंमत फक्त ५ हजार १०० रुपये आहे. पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या या कूलरला तुम्ही रुम आणि हॉल थंड करण्याासाठी वापर करू शकता. टर्बो फॅन टेक्नोलॉजी, पॉवरफुल एयर थ्रो, मॅक्सिमम कूलिंगसाठी हनीकंब पॅड्स सह अन्य फीचर्स दिले आहेत. या कूलर मध्ये एनर्जी सेविंगचा दावा आहे. या कूलरची बॉडी थर्मोप्लास्टिकची आहे. याचे वजन ८.३ किलोग्रॅम आहे. वाचाः Bajaj TC 2007 Room 37 लीटर Air Cooler बजाजच्या या कूलरला तुम्ही अॅमेझॉनवर ५ हजार ९९० रुपयांत खरेदी करू शकता. वॉटर लेवल इंडिकेटर असलेल्या या कूलरची कॅपिसिटी ३४ लीटरची आहे. Blower टेक्नॉलजी, डस्ट प्रोटेक्शन, ओवरफ्लो इंडिकेटर आणि आइस बॉक्स असलेल्या या कूलरचे वजन १२.५ किलोग्रॅम आहे. थर्मोप्लास्टिक असलेल्या या फिल्टरमध्ये मोस्क्विटो नेट, डस्ट फिल्टर सारखे फीचर्सची कमी आहे. वाचाः Bajaj PC 2012 20 लीटर एयर कूलर बजाजने ६ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत हे जबरदस्त कूलर लाँच केले आहे. जे पांढऱ्या आणि ग्रे रंगाच्या ऑप्शन मध्ये आहे. थर्मोप्लास्टिक बॉडी असलेल्या या कूलरची वॉटर कॅपिसिटी २० लीटरची आहे. या कूलरला तुम्ही फ्लिपकार्टवर ५ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. १२.९ किलोग्रॅम वजन असलेल्या या कूलर मध्ये ओव्हरफ्लो इंडिकेटर, आइस चेंबर सारखे फीचर्स दिले आहेत. या कूलरसोबत तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळते. वाचाः वाचाः वाचाः
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fupCDx
Comments
Post a Comment