मस्तच! जिओचा पहिला 5G फोन आणि स्वस्त लॅपटॉप जिओबुक येतोय

नवी दिल्लीः रिलायन्स जिओचा 5G फोन आणि लॅपटॉप लवकरच बाजारात लाँच करण्यात येणार आहेत. एका रिपोर्टमधून ही माहिती उघड झाली आहे. या वर्षीच्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM) मध्ये जिओ आपला पहिला 5G स्मार्टफोन आणि कमी किंमतीचा लॅपटॉप जिओ बुक लाँच करू शकते. स्मार्टफोन गुगलच्या पार्टनरशीपमध्ये तयार केला जात आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हा अँड्रॉयड आणि अँड्रॉयड गो, गुगलचे लाइटवेट ओएस आहे. ज्याला एन्ट्री लेवल हार्टवेयर स्मार्टफोनसाठी डिझाइन केले आहे. रिपोर्टमध्ये लॅपटॉप संबंधी जास्त माहिती शेयर करण्यात आली नाही. वाचाः 5G फोनच्या ओएसवर जिओ - गुगल मध्ये चर्चेवर एका अधिकाऱ्याने सांगितले की, टेलीकॉमटॉक ने आपल्या रिपोर्टमध्ये जिओ आणि गुगल अजूनही चर्चा करीत आहेत. अँड्रॉयडच्या कोणत्या फोनमध्ये द्यायला हवे. अधिकारीने सांगितले की, जिओच्या ५ जी स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयड गो ओएसची सुविधा मिळू शकते. तसचे हे एन्ट्री लेवल वैशिष्ट्येसोबत येऊ शकते. जिओ आपल्या कमी किंमतीच्या ५जी स्मार्टफोन्समध्ये भारतीय बाजारात आणखी पकड मजबूत करेल. रिपोर्टमध्ये हेही सांगितले की, स्मार्टफोनसाठी अँड्रॉयड बेस्ड (JioOS)वर सुद्धा काम करीत आहे. वाचाः लॅपटॉपसाठी JioOS तयार करीत आहे कंपनी जिओ कडून JioOS तयार केला जात आहे. रिलायन्स जिओ 4G LTE कनेक्टिविटी सोबत कमी किंमतीत लॅपटॉप जिओ बुकच्या निर्माणसाठी चिनी निर्माता कंपनी ब्लूबँक कम्युनिकेशन टेक्नोलॉजीसोबत पार्टनरशीप करीत आहे. जिओबुकचे डेव्हलपमेंट गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातील सुरुवातीत झाले होते. वाचाः जिओबुकचे संभावित वैशिष्ट्ये रिलायन्स जिओबुक मध्ये जाहीर पणे एचडी (1,366x768 पिक्सल) डिस्प्ले आणि हुडच्या खाली स्नॅपड्रॅगन X12 4G मोडेम सोबत क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरची जोडी असणार आहे. यात ४ जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि ६४ जीबी पर्यंत eMMC स्टोरेजची सुविधा दिली जाणार आहे. स्मार्टफोनवर कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये एक मिनी एचडीएमआय कनेक्टर, ड्यूअल बँड वायफाय आणि ब्लूटूथचा समावेश असू शकतो. लॅपटॉपमध्ये जिओस्टोर, जिओमीट आणि जिओ पेजेस सारखे अॅप्स प्री लोडेड मिळू शकतात. वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31cjdob

Comments

clue frame