Samsung Galaxy A72 आणि A52 स्मार्टफोन 'या' दिवशी होणार लाँच

नवी दिल्लीः आणि स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी जास्त वाट पाहावी लागणार नाही. ९१ मोबाइल्सच्या एका रिपोर्टनुसार, कंपनी या दोन्ही स्मार्टफोन्सला भारतात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच करण्याची शक्यता आहे. दोन्ही स्मार्टफोन्सच्या काही आठवड्याआधी लीक्स समोर आली होती. त्यावरून आता ही माहिती समोर येत आहे. कंपनीकडून या दोन्ही अपकमिंग स्मार्टफोन्सच्या लाँचिंग संदर्भात अधिकृत डिटेल अद्याप समोर आली नाही. वाचाः काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, A52 5G ला गुगल प्ले लिस्टिंगवर पाहिले गेले होते. लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G SoC प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्स ओएसवर काम करतो. वाचाः सॅमसंग गॅलेक्सी A52 मध्ये मिळू शकते हे फीचर गुगल प्ले लिस्टिंगच्या माहितीनुसार, फोनमध्ये ६ जीबी रॅम सोबत स्नॅपड्रॅगन 750G SoC ऑफर केले जाऊ शकतो. फोनमध्ये पंच होल कटआऊट सोबत फुल एचडी प्लस इनफिनिटी ओ स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे. ओएस मध्ये हे अँड्रॉयड ११ ओएस सोबत येऊ शकते. सुरुवातीला आलेल्या रिपोर्टनुसार, रिपोर्ट्समध्ये म्हटले की, या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले ऑफर मिळू शकतो. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे मिळू शकतो. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर, एक ५ मेगापिक्सलचा आणि एक २ मेगापिक्सलचा सेन्सर मिळू शकतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. वाचाः गॅलेक्सी A72 ची संभावित फीचर कंपनी या फोनमध्ये 90Hz चे रिफ्रेश रेट सोबत ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत स्नॅपड्रॅगन 720G SoC दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा, एक १२ मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनच्या फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळू शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची बॅटरी मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/37rS44i

Comments

clue frame