Samsung Galaxy A52 ची किंमत उघड, १५ मार्चआधी होऊ शकते विक्री

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. फोनच्या लाँचिंगची चाहत्यांना फार उत्सूकता आहे. या फोनसंबंधी नवीन-नवीन लिक्स समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका लीकमध्ये फोनच्या किंमतीचा उल्लेख करण्यात आला होता. आता टेक्नीकन्यूजच्या रिपोर्टमधून याच्या सेलच्या तारखेची डिटेल्स समोर आली आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, Samsung ४ जी आणि ५ जी व्हेरियंटमध्ये येणार आहे. याच्या ४जी ची किंमत ३४९ युरो म्हणजेच ३० हजार ७०० रुपये आणि ५जी व्हेरियंटची किंमत ४४९ युरो म्हणजेच ३९ हजार ६०० रुपये असू शकते. हा फोन ६ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरियंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. वाचाः रिपोर्टमध्ये हाही दावा करण्यात आला आहे की, फोनला २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंट सोबत आणले जाऊ शकते. कंपनी फोनच्या २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ५० यूरोहून जास्त किंमतीत लाँच करू शकते. फोनची सेल मार्चमधील दुसऱ्या आठवड्यापासून केली जाण्याची शक्यता आहे. फोनला ब्लू, ब्लॅक, आणि पर्पल कलर ऑप्शनसोबत मार्केटमध्ये एन्ट्री करू शकते. वाचाः फोनची संभावित फीचर्स फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत ६.५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७५० जी चिपसेट देऊ शकते. सॅमसंगच्या या अपकमिंग स्मार्टफोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले जाऊ शकते. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा, एक ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर मिळू शकतो. फोनमध्ये सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेर दिला जाऊ शकतो. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZkhjAT

Comments

clue frame